शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

आकड्याच्या चक्रव्यूहात जुगारी पोहचला ‘आयसीयू’त

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 3:26 PM

संसाराची राखरांगोळी : पत्नी अन् मुलांना पोरके होण्याची भीती

ठळक मुद्देलोकमतने पिंपरी-चिंचवड होतेय अवैध धंद्यांचे आगार अशी वृत्तमालिका केली प्रसिद्ध

पिंपरी : मटक्याच्या आकडेवारीचे गणित जुळवता-जुळवता संसाराचे समीकरण चुकत गेले. कष्टाने कमावलेला जुगारापाई सर्व काही मातीमोल झाले. आकड्यांच्या व्यसनाने पतीने संसाराचा राखरांगोळी करीत सर्वस्व गमावले, अशी व्यथा एका महिलेने ‘लोकमत’कडे मांडली. त्यांच्या पतीचा भाजीपाला व्यवसाय ते थेट ‘आयसीयू’मध्ये दाखल, असा हृदयद्रावक शेवटचा प्रवास सुरू आहे.लोकमतने पिंपरी-चिंचवड होतेय अवैध धंद्यांचे आगार अशी वृत्तमालिका प्रसिद्ध केली. त्यामध्ये जुगार अन् मटक्याच्या नादाने अनेक संसार उद्ध्वस्त होत असल्याचे वास्तवही मांडले. त्यानंतर एक महिलेने लोकमतच्या कार्यालयात फोन करून मला माझी व्यथा मांडायची आहे, असे सांगितले. ही व्यथा आहे ताथवडे परिसरात राहणा-या लक्ष्मीबाई (नाव बदलले आहे) यांची. भाजीपाल्याची विक्री करून सुखाने संसार सुरू होता.  मित्रांच्या नादाला लागून २१ व्या वर्षांपासूनच पती बाळासाहेबांना मटक्याची चटक लागली. तुझे आकडे बरोबर येतात, असे सांगून मित्रांच्या नादाने त्यांना आकड्याचे व्यसन लागले. एकीकडे वय वाढत असतानाच त्यांच्या आकडा लावण्याच्या रकमाही वाढत गेल्या. तशी कुटुंबाला देखील उतरती कळा लागली. नाद सुटने म्हणून संसाराचा गाडा मी कष्टाने ओढू लागले. केवळ मला साथ द्या, कोणाच्याही नादाला लागू नका, मुले मोठी होताहेत. त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, असे  सांगण्याचा प्रयत्न केला.  तरीही  मटक्याची आकडेमोड करीत त्यांनी  मुला बाळांची अभाळ तर केलीच, सारा संसार उद्ध्वस्थ करून टाकला.  एवढेच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून मुलाच्या लग्नासाठी जमा केलेली व घरात जपून ठेवलेली ३ लाख रुपयांची रक्कम आकड्याच्यादोन दिवसांत उडविली. तिस-या दिवशी भानावार आल्यावर कळले की आपण आकड्यांच्या धुंदीत मुलाच्या लग्नासाठी जमविलेला पैसाही उडविला.  या मानसिक झटक्यातून ते सावरू शकले नाहीत. त्यांना मानसिक धक्कयाबरोबर चार दिवसांपूर्वी हृदय विकाराचा झटका आला. आज ते मृत्यूूूच्या दाढेत अडकले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. जुगाराच्या नादात माझ्या संसाराची राखरांगोळी झाली.........मटक्याने नेले जीवनमरणाच्या दारात४पत्नीच्या जीवावर संसार आणि खर्च पाणी सुरू असतानादेखील आकडा मात्र सुटला नाही. बाबासाहेबांनी पै-पै करून घेतलेली जागादेखील विकली अन् भाड्याच्या खोलीत राहावयास गेले. पत्नीकडून पैसे न भेटल्यास कांदे अन् बटाटेच्या गोणी विकून मटका खेळला. अखेर या मटक्याच्या चक्रव्यूहाने बाबासाहेबांना जीवनमरणाच्या दारात उभे केले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीhospitalहॉस्पिटल