शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

‘उर्दू’तील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात

By admin | Updated: June 17, 2016 05:12 IST

स्थानिक प्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून महापालिकेने शहरात उर्दू शाळा सुरू केल्या. मात्र, गेल्या वर्षभरात माध्यमिक विभागाच्या सहा उर्दू शाळेतील नववी व दहावीच्या वर्गांना शासनाची

- सुवर्णा नवले, पिंपरी

स्थानिक प्रतिनिधींच्या दबावाला बळी पडून महापालिकेने शहरात उर्दू शाळा सुरू केल्या. मात्र, गेल्या वर्षभरात माध्यमिक विभागाच्या सहा उर्दू शाळेतील नववी व दहावीच्या वर्गांना शासनाची अद्याप मान्यता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे सुमारे २१७ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून, पालक हवालदिल झाले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेक्षणातून महापालिक ा शिक्षण प्रशासनाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी, नेहरुनगर, फुगेवाडी, थेरगाव, लांडेवाडी, रुपीनगर या भागातील उर्दू माध्यमाच्या सहा शाळा महापालिकेने सुरू केल्या. महापालिकेने शाळा सुरू करण्यासाठी केवळ सर्वसाधारण सभेची मान्यता घेतली. परंतु, पुढील वर्षी नववी व दहावीचे वर्ग सुरू करावे लागणार आहेत. हे माहिती असूनही प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. मात्र, शैक्षणिक वर्ष संपल्यामुळे आठवीच्या विद्यार्थ्यांना नववीत आणि नववीच्या विद्यार्थ्यांना दहावीत प्रवेश द्यावा लागणार आहे. दहावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाच्या ‘एसएससी’ बोर्डाची मान्यता अनिवार्य असते. बोर्डाकडून मान्यतेनंतर संबंधित शाळेला केंद्र क्रमांक मिळतो. मग, संबंधित शाळा शासकीय, निमशासकीय असो की खासगी. परंतु, अनेकदा शासनाची मान्यता मिळण्याच्या भरवश्यावर दहावीचे वर्ग सुरू केले जातात. मग, ऐन परीक्षेच्या काळात मान्यतेसाठी धावपळ होते. हाच प्रकार महापालिकेच्या उर्दू शाळांची झाली आहे. शिक्षण विभागाने यंदा १८ खासगी शाळा अनधिकृत ठरविल्या आहेत. त्या शाळांकडे मान्यतेसाठी वारंवार पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जातो. महापालिकेच्या उर्दू शाळा सुरू करताना हाच प्रकार घडलेला आहे. विद्यार्थी नववी व दहावीच्या प्रवेशासाठी चौकशी करू लागल्यामुळे शिक्षकांचा गोंधळ उडाला असून, पालक चिंतेत पडले आहेत. अद्याप नववी व दहावीच्या वर्गांना मान्यता नाही, त्यामुळे प्रवेश देणे अडचणीचे ठरत आहे. हतबल पालकशाळा सुरू होण्यापूर्वी पालकांना सूचित करणे गरजेचे होते. मात्र, शाळेत पालकांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे पालक हतबल झाले. मुलांच्या भविष्याचा विचार पालकांच्या डोळ्यांसमोर उभा राहिला. यासाठी महापालिका प्रशासनाला माध्यमिक बोर्डाच्या मान्यतेसाठी शासनाकडे पत्रव्यवहार करणे गरजेचे आहे. तसेच शिक्षण उपसंचालकाकडे यापूर्वी आठवी व नववीच्या तुकड्या सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर कोणतीही कार्यवाही पुढे झाली नाही. मान्यतेसाठी नक्की कोणती प्रक्रिया करायची याविषयी मुख्याध्यापकही अनभिज्ञ असल्याचे लोकमतच्या पाहणीतून दिसून आले आहे. प्रशासनाचा सावळा गोंधळ महापालिकेच्या शाळांना मान्यता मिळविण्यासाठी शाळास्तरावरून प्रथम प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्याशिवाय शाळा सुरू करण्यासाठी सोसायटी अधिनियम नोंदणी प्रमाणपत्र, संस्थेची घटना, तीन वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल, बँक नमुना ठेव प्रमाणपत्र, तसेच शुल्काच्या मूळ चलनप्रती, दर्जावाढीसाठी आवश्यक खोल्या, इमारती, फर्निचर, शिक्षणसाहित्य असणे आवश्यक आहे. महापालिकेला ही सर्व कागदपत्रे गतवर्षीच २०१५-१६ला शासन मान्यतेसाठी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा जागे झालेल्या महापालिका प्रशासनाला त्यासाठी तातडीने पावले उचलावी लागणार आहेत. शाळा मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविणार आहे. महापालिकेची मान्यता शाळांना गतवर्षी मिळाली आहे. मात्र या वर्षी शासनमान्यतेसाठी प्रस्ताव लवकरच जाईल. याचा कोणताही विपरीत परिणाम पालक व विद्यार्थ्यांवर होणार नाही. वर्ग सुरूच राहणार आहेत.- बी. सी. कारेकर, प्रशासन अधिकारी