Pimpri Chinchwad: दारू पिताना वादातून हातोडी मारल्यामुळे मित्राचा मृत्यू; खूनाप्रकरणी गुन्हा दाखल
By नारायण बडगुजर | Updated: February 3, 2024 18:32 IST2024-02-03T18:31:37+5:302024-02-03T18:32:00+5:30
तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात २ जानेवारी २०२४ रोजी ही घटना घडली...

Pimpri Chinchwad: दारू पिताना वादातून हातोडी मारल्यामुळे मित्राचा मृत्यू; खूनाप्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी : दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राला हातोडीने मारहाण करीत गंभीर जखमी केले. तळेगाव दाभाडे येथील जिजामाता चौकात २ जानेवारी २०२४ रोजी ही घटना घडली. दरम्यान, जखमी झालेल्या मित्राचा उपचारादरम्यान ३० जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्यानुसार, पोलिसांनी गुन्ह्यात कलम वाढ केली.
फिरोज बहाणू (रा. जिजामाता चौक, तळेगाव दाभाडे) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. प्रमोद जयचंद चव्हाण (२७) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दुर्गेश भगेलु चौरसिया (रा. सिद्धार्थ नगर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद चव्हाण, दुर्गेश चौरसिया आणि फिरोज बहाणू हे तिघेजण बंद खोलीमध्ये दारू पीत होते. त्यावेळी चौरसिया याने जुन्या भांडणाचा राग काढून भांडण करण्यास सुरुवात केली. बहाणू यांच्या डोक्यात हातोड्याने मारहाण केली. तसेच, चव्हाण यांना मारहाण केली. या मारहाणीत बहाणू हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान ३० जानेवारी रोजी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यानुसार, पोलिसांनी गुन्ह्यात कलम वाढ केली.