शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जादा परताव्याच्या आमिषाने ३१ लाख ५८ हजारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 12:40 IST

बँकेचे खातेधारक असलेल्या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल

- नारायण बडगुजरपिंपरी : गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यातून एका व्यक्तीची ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपयांची फसवणूक केली. व्हाटसॲपवरून ऑनलाइन पद्धतीने सप्टेंबर २०२४ ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला. पिंपळे गुरव येथील ५२ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी शुक्रवारी (दि. १४ फेब्रुवारी) सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गितीका आनंद, व्हाटसॲप नंबरधारक, लिंकधारक, तसेच बँकेचे खातेधारक असलेल्या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गितीका आनंद या संशयित व्यक्तीने फिर्यादी यांना व्हाटसॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर ग्रुपमधील लिंकवर क्लिक करण्यास सांगून फिर्यादीच्या मोबाइलमध्ये झेडडी ट्रेड प्रो ॲप डाउनलोड करण्यास भाग पाडले. या साॅफ्टेअरच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा मिळत असल्याचे ग्रुपवर भासवले. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीस बँकेचे खात्यावर ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, गुंतवणुकीवर परतावा व गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता संशयितांनी फिर्यादीची फसवणूक केली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस