शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

बनावट विक्री कराराद्वारे शेतकऱ्याची फसवणूक : ११ जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 20:01 IST

बनावट असलेली कागदपत्रे खरी असल्याचे भासवून सार्वजनिक नोंदी बदलून शासकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली..

पिंपरी : जमीन हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे तयार केली. त्याआधारे अकरा जणांनी बनावट विक्री करार करून मूळ शेतकऱ्याची फसवणूक केली. ही घटना आझादनगर, चऱ्होली येथे घडली. याप्रकरणी प्रमोद प्रकाश तापकीर (वय ४१, रा. आझादनगर, चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रामसिंग सरदारसिंग बगलाल (वय ६३), सुशीला रामसिंग बगलाल (वय ५६), रणजितकौर रामसिंग बगलाल (वय ३२), पप्या रामसिंग बगलाल (वय ३०), सुमन चंदरसिंग बगलाल (वय ६१, सर्व रा. चऱ्होली),  राहुलसिंग चंदरसिंग बगलाल (वय ३५), अमरसिंग चंदरसिंग बगलाल (वय ३०), सुनीता चंदरसिंग बगलाल (वय ३४), शीतल चंदरसिंग बगलाल (वय ३२), गीता चंदरसिंग बगलाल (वय ३०), आदेश भाऊसाहेब हांडे (वय ३५) सर्व रा. आवताडवाडी, हांडेवाडी, पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद आणि त्यांचे नातेवाईक छबू लक्ष्मण तापकीर यांच्यामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद आहे. आरोपी हे छबू यांचे नातेवाईक नसताना देखील त्यांनी मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे बनवली. बनावट असलेली कागदपत्रे खरी असल्याचे भासवून सार्वजनिक नोंदी बदलून शासकीय अधिकाऱ्यांना चुकीची माहिती दिली. वेगवेगळ्या महसूल अधिकारी आणि दिवाणी न्यायालयात खोटी प्रमाणपत्रे आणि खोट्या साक्ष देऊन प्रमोद तापकीय यांच्या मालमत्तेचे बनावट विक्री करार करून फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.

टॅग्स :dighiदिघीfraudधोकेबाजीFarmerशेतकरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस