ऑनलाइन ट्रान्झक्शन करून 1 लाख 31 हजारांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 15:22 IST2019-09-29T15:19:22+5:302019-09-29T15:22:23+5:30
ऑनलाईन व्यवहार करुन 1 लाख 31 हजारांची आर्थिक फसवणुक केल्याची घटना चिंचवड येथे घडली आहे.

ऑनलाइन ट्रान्झक्शन करून 1 लाख 31 हजारांची फसवणूक
पिंपरी : विम्याची माहिती मिळवून वेळोवेळी फोन करून संपर्क साधला. त्याआधारे एक लाख ३१ हजार ६९ रुपये वेळोवेळी ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करून आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी धनंजय अशोकराव जोशी (वय ३९, रा. उद्योगनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै २०१९ पासून वेळोवेळी हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अज्ञात आरोपींनी विविध फोन नंबरवरून फिर्यादी जोशी यांना संपर्क साधला. त्यांच्याकडून विम्याची माहिती मिळवून फिर्यादी जोशी यांच्या बँक खात्यातून वळोवेळी एक लाख ३१ हजार ६९ हजार रुपयांचे ऑनलाइन ट्रान्झक्शन करून आर्थिक फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.