शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

गृहप्रकल्पांसाठी आता चौथ्या सल्लागाराची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 5:43 AM

शहरात ठिकठिकाणी हे गृहप्रकल्प बांधण्यासाठी निविदापश्‍चात आणि निविदापूर्व कामांकरिता यापूर्वी तीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमले असताना आता चौथ्या सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. 

ठळक मुद्देपंतप्रधान आवास योजना महापालिका प्रशासनाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत महापालिकेमार्फत शहरात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) आणि बेघरांसाठी घरे (एचडीएच) या योजनांसाठी गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहे. शहरात ठिकठिकाणी हे गृहप्रकल्प बांधण्यासाठी निविदापश्‍चात आणि निविदापूर्व कामांकरिता यापूर्वी तीन प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमले असताना आता चौथ्या सल्लागाराची नेमणूक करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे २0२२ ही योजना राबविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) आणि बेघरांसाठी घरे (एचडीएच) या योजनांसाठी आरक्षित जागांवर घरे बांधण्याचे धोरण महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. त्यामध्ये ईडब्ल्यूएसअंतर्गत रावेत, दिघी, डुडुळगाव, मोशी-बोर्‍हाडेवाडी, चर्‍होली, वडमुखवाडी, चिखली येथे सुमारे १२ हेक्टर जागेवर आरक्षण आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत या आरक्षित जागांवर तब्बल नऊ हजार ४५८ घरे बांधणे शक्य होणार आहे. या जागांवर १२ ते १४ मजली इमारती बांधण्यात येणार आहे. अडीच एफएसआय वापरून त्याचे आराखडे, नकाशे तयार करून त्याला परवानगी घेण्यात येणार आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सरकारची मंजुरी घेण्यासाठी आणि ठेकेदारांकडून गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने निविदापूर्व आणि निविदापश्‍चात कामासाठी इनग्रेन आर्किटेक्ट अँण्ड अर्बन प्लॅनर, सोल स्पेस आणि जिनीअस टेक्नॉलॉजीज या तीन आर्किटेक्ट आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची यापूर्वी नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार, इनग्रेन आर्किटेक्ट चर्‍होली आणि रावेत येथील गृहप्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सरकारच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. तर डुडुळगाव, दिघी आणि चिखलीतील गृहप्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. सोलस्पेस यांनी बोर्‍हाडेवाडी येथील गृहप्रकल्पाचा अहवाल तयार करून सरकारच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. तर आकुर्डी, पिंपरी येथील घरे बांधणीचे प्रकल्प अहवाल सुरू आहे. 

या गृहप्रकल्पासाठी तीन ठेकेदार सल्लागार म्हणून काम करीत असताना आता एम. एम. प्रोजेक्ट कन्सल्टंट्स या चौथ्या सल्लागाराने २८ ऑक्टोबर रोजीच्या पत्राद्वारे स्मार्ट सिटी, पंतप्रधान आवास योजना किंवा झोपडपट्टी पुनर्वसनासाठी आर्किटेक्ट आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार पॅनेलवर काम करण्यास इच्छूक असल्याचे कळविले आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रोफाइलवरून झोपडपट्टी पुनर्वसन आणि शहरी गरिबांकरिता घरे बांधण्याच्या क्षेत्रात त्यांना २0 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी मुंबईतील धारावीत पुनर्विकास प्रकल्प, झोपडपट्टीमुक्त मुंबई विमानतळ, नागपूर आणि लातुर येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे काम केले आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारचे अनुदान प्राप्त झाल्यानंतर महापालिका निविदा काढून ठेकेदारांमार्फत हे प्रकल्प राबविणार आहे. त्यामुळे यापूर्वी तीन सल्लागारांची नेमणूक केली असली, तरी कामाची व्याप्ती बघून आणि प्रकल्प वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने एम. एम. प्रोजेक्ट कन्सल्टंट्स यांची महापालिका पॅनलवर पंतप्रधान आवास योजनेकरिता चौथे आर्किटेक्ट आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. -