शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तळेगाव दाभाडे येथे पादचारी महिलेचे चार तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 18:08 IST

काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चार तोळ्याचे मंगळसूत्र  हिसकावून दुचाकीवरून पलायन केले.

तळेगाव दाभाडे : भाजी खरेदी करून घरी जात असलेल्या पादचारी महिलेच्या गळ्यातील  सुमारे ९२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकाविले. ही घटना रविवारी सायंकाळी ७.३०च्या सुमारास तळेगाव स्टेशन भागातील तपोधाम कॉलनी येथे सरस्वती शाळेजवळ  घडली.या संदर्भात सोनाली संभाजी मराठे  (वय३३,रा.भुशीगाव,लोणावळा,ता.मावळ,जि.पुणे)यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,सोनाली मराठे या मुलांसह उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी तळेगाव स्टेशन येथे माहेरी आल्या होत्या.भावजय सायली गायकवाड यांच्यासह त्यांनी रविवारी  सायंकाळी स्टेशन भागातील शिवाजी चौक येथे भाजी खरेदी केली. त्यानंतर सरस्वती शाळेच्या मागील बाजूने तपोधाम कॉलनीतील घराकडे पायी जात असता काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी चार तोळ्याचे मंगळसूत्र  हिसकावून दुचाकीवरून पलायन केले.या घटनेमुळे शहर परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले  आहे.दोघेही  चोरटे २५ते ३० वर्षे वयोगटातील असून  अंगाने सडपातळ आहेत. दुचाकी चालकाच्या  अंगात काळ्या रंगाचा  फुल बाह्यांचा शर्ट आहे. दुचाकीवर मागे  बसलेल्या चोरट्याने मंगळसूत्र खेचले असून त्याच्या अंगात पांढ?्या रंगाचा फुल बाह्यांचा टी शर्ट आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहे.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGoldसोनंtheftचोरी