पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 01:38 PM2018-06-15T13:38:10+5:302018-06-15T13:38:10+5:30

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या वर्षभरात अनेक घटना घडल्या आहे.

Four person were injured in cylinder blast | पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी

पिंपरीत सिलिंडरच्या स्फोटात चौघे जखमी

Next
ठळक मुद्देगॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता

पिंपरी : पिंपरी येथे गॅस गळती होऊन घरातील सिलिंडरचा मोठा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.१५जून) सकाळी नऊच्या सुमारास पिंपरी नेहरुनगरात घडली. यामध्ये चौघे जण जखमी झाले आहेत. त्यात एकाची प्रकृती गंभीर आहे. तर घराचे पत्रे उडून गेले आहेत.
प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींध्ये दुर्गेश सिंग (वय १२), शिवा सिंग (वय १०) हे दोघे साठ टक्के भाजले आहेत. तर, संदीप सिंग (वय २१), लबला देवी सिंग (वय ३२) यांचा समावेश आहे. संदीप आणि लबाला देवी हे दोघे झळांमुळे किरकोळ जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. संदीप सिंग हे नेहरूनगरात राहतात. सकाळी नऊच्या सुमारास अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की घराचे पत्रे देखील उडाले. जोराचा आवाज झाल्याने नागरिक सिंग यांच्या घराच्या दिशेने धावले. त्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी या आगाची माहिती संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाला दिली. परंतु, अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच स्थानिकांनी आग विझवली होती. या आगीत चार जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांना जास्त भाजले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. गॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जखमींवर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएमएच) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले  आहे. 
सिलिंडरचा स्फोट होण्याचे प्रमाण वाढले
घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन जखमी होण्याच्या वर्षभरात अनेक घटना घडल्या असून चिखली, सांगवी, वाल्हेकरवाडी परिसरातील सिलिंडरचा स्फोट होऊन किरकोळ जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत. देहू परिसरात सिलिंडरचे रिफलींग करतानाही एक व्यक्ती जखमी झाला होता. गॅस गळती झाली असल्यामुळे स्फोट झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गॅस एजन्सीकडूनही दिलेल्या जाणाऱ्या सिलिंडर गळके असतात. त्यामुळेही अपघात घडण्याचे प्रकार घडले आहेत. गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना अपघात टाळण्यासाठी नागरिकांचे प्रशिक्षण घेण्याची गरज आहे.

Web Title: Four person were injured in cylinder blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.