शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी लंपास केले चार मोबाईल फोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 17:14 IST

मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट आहे.

पिंपरी : वेगवेगळ्या प्रकरणात चार मोबाईल फोन चोरीला गेल्याचा प्रकार पिंपरी-चिंचवड शहरात घडला. अनोळखी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोबाईल चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश ऋषीकुमार मोरे (वय २०, रा. गंगानगर, पेठ क्रमांक २८, प्राधिकरण) रविवारी (दि. ७) बिजलीनगर येथील रेल्वेस्टेशन टनेल जवळून गुरुव्दारा रस्त्याने मित्राकडे जात होेते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडविले. मारहाण करून जखमी करून त्यांच्याकडील ३६ हजार ९०० रुपये किमतीचा मोबाईल फोन हिसकावून अनोळखी व्यक्तींनी चोरून नेला. प्रथमेश मोरे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.दुसऱ्या घटनेत प्रवीण लक्ष्णम माने (वय ३१, रा. शिवतेज हाउसिंग सोसायटी, चिखली) सोमवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास स्पाईन रस्त्यावर मोबाईल फोनवर बोलत होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने ९ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. प्रवीण माने यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.तिसºया घटनेत घरफोडी करून चोरट्यांनी दोन मोबाईल फोन लंपास केले आहेत. बापूराव बाळासाहेब सूर्यवंशी (वय ३०, रा. दत्तवाडी, आकुर्डी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बापूराव सूर्यवंशी यांचे घर आतून बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने खीडकीतून हात घालून घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. घरातील १६ हजार ३०० रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन घरफोडी करून चोरून  नेले आहेत. दि. १८ मार्चला रात्री ११ ते दि. १९ मार्चला पहाटे चारच्या दरम्यान हा प्रकार घडला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर