शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

फसव्या भाजपा सरकारची केवळ आश्वासने, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 01:20 IST

अच्छे दिन येणार असे आश्वासन देत भाजपा सरकारने सत्तेत येऊन साडेचार वर्षे पूर्ण केली. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे.

पिंपरी  - अच्छे दिन येणार असे आश्वासन देत भाजपा सरकारने सत्तेत येऊन साडेचार वर्षे पूर्ण केली. निवडणुका तोंडावर आल्याने पुन्हा जनतेला भावनिक आवाहन केले जात आहे. यापुढे भाजपाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.सांगवीतील पीडब्ल्यूडीच्या मैदानावर राष्टÑवादी काँग्रेस पक्षातर्फे निर्धार सभा घेण्यात आली. या प्रसंगी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विलास लांडे, अण्णा बनसोडे, भाऊसाहेब भोईर, नाना काटे, प्रशांत शितोळे, वर्षा जगताप आदी उपस्थित होत्या.या वेळी अजित पवार म्हणाले, भाजपा सरकारने जनतेला आश्वासनांचे गाजर दाखवले. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले. कर्जमाफी झाली नाही, शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत, इंधन दरवाढ केली, जीएसटी लागू करून उद्योजक, व्यावसायिकांपुढे अडचणी वाढवल्या, काळा पैसा बाहेर काढतो, असे सांगून नोटाबंदी केली, विविध समाज घटकांना आरक्षणाचे गाजर दाखवले. निवडून आल्यानंतर पहिल्याच सभेत धनगर समाजाला आरक्षण देणार, अशी घोषणा केली होती. सत्तेतील कालावधी संपुष्टात येण्याची वेळ आली तरी धनगर समाजाला आरक्षण मिळू शकले नाही. सर्वच घटकातील नागरिक या सरकारवर नाराज आहेत. हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे.अ‍ॅड़ प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून इतर घटकाचे एकत्रिकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाविरोधात लढा देण्यासाठी त्यांच्यासह वंचित घटकाला बरोबर घेण्याची आमची भूमिका आहे.नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जनतेला खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकºयांना दरमहा ५०० रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये साधूंना पाच हजार रूपये अनुदान दिले जाणार आहे. पाच राज्यांत पराभव झाल्यानंतर त्यांची अस्वस्थता जाणवू लागली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निर्धार मेळाव्यात भाजपाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. ते म्हणाले, निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वासने काय दिली, त्या आश्वासनांची पूर्तता किती केली? हे त्यांच्या निवडणुकीपूर्वीच्या आणि निवडणुकीनंतरच्या वक्तव्यावरून लक्षात येते. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर देशातील कोणीही सुखी झाला नाही. राफेल घोटाळा बाहेर आला. त्याबद्दल भाजपाचे कोणीच काही सांगत नाही. इंधन दरवाढ, महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपाचे नेते काय बोलले, निवडणुकीनंतर काय बोलत आहेत, याच्या व्हिडीओ क्लिप स्क्रिनवर दाखविण्यात आल्या.विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, मी स्वत: भाजपाच्या १६ मंत्र्यांचे ९० हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढले. पुरावे सादर केले. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली. बेरोजगारी, महागाई यामुळे जनता संतापली आहे. बदल घडवून आणण्याची हीच वेळ आहे.माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले, राफेल घोटाळ्यात भाजपाने ५५० कोटींचे राफेल विमान १६५० कोटींना खरेदी केले. याबद्दल स्पष्टीकरण देण्यास कोणीच तयार नाही. काळा पैसा आणू असे म्हणणारे बँकांना गंडा घालून परदेशात गेलेल्यांना पाठीशी घालत आहेत. आश्वासनांची खैरात करणारे भाजपा सरकार सर्वच बाबतीत फेल गेले आहे. यामध्ये भाजपाचे जेवढे पाप आहे. तेवढेच पाप शिवसेनेचे आहे. न मागता सवर्णांना दहा टक्के आरक्षण दिले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती द्यावी, त्यांचे शैक्षणिक शुल्क सरकारने भरावे. १०० शहरे स्मार्ट सिटी करणारे चार शहरेसुद्धा स्मार्ट बनवू शकले नाहीत.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारPoliticsराजकारणpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड