Pimpri Chinchwad: गोवा येथून आणलेला पावणे चार लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
By नारायण बडगुजर | Updated: August 29, 2023 16:15 IST2023-08-29T16:10:23+5:302023-08-29T16:15:08+5:30
दुपारी पावणे चारच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावार ही कारवाई केली...

Pimpri Chinchwad: गोवा येथून आणलेला पावणे चार लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त
पिंपरी : विक्रीसाठी गोवा येथून आणलेला तीन लाख ७४ हजार रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोमवारी (दि. २८) दुपारी पावणे चारच्या सुमारास जुना पुणे-मुंबई महामार्गावार ही कारवाई केली.
मधुकर मोतीराम शिरसाट (वय ४०, रा. प्रेमलोकपार्क, चिंचवड. मूळ रा. दळवीनगर झोपडपट्टी, चिंचवड) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस अंमलदार विकास तारू यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुकर शिरसाट याने अवैधरीत्या गोवा राज्यातून विदेशी मद्यसाठा विक्रीसाठी महाराष्ट्रात आणला.
याबाबत माहिती मिळाली असता तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई केली. यावेळी मधुकर शिरसाट हा अवैधरित्या आणलेल्या मद्याची वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी या कारवाईत तीन लाख ७४ हजार २०० रुपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला.