मोशीतून अपहरण करुन लावला अल्पवयीन तरुणीचा जबरदस्तीने विवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 15:03 IST2018-05-26T15:03:14+5:302018-05-26T15:03:14+5:30
पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.

मोशीतून अपहरण करुन लावला अल्पवयीन तरुणीचा जबरदस्तीने विवाह
पिंपरी : मोशीतून अपहरण करून तरुणीचा जबरदस्तीने मुंबई येथे विवाह लावण्यात आला. या प्रकरणी चार जणांवर एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.चिमणाजी चौधरी, नथाराम जसाराम चौधरी (दोघेही रा. नेरूळ, नवी मुंबई), जोगाराम चौधरी (रा. पनवेल) आणि काळुराम चौधरी अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. मोशी येथे राहणाऱ्या तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ एप्रिल २०१८ रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास आरोपींनी संगनमत करून तरुणीचे अपहरण केले. त्यानंतर मुंबईतील बांद्रा परिसरात जबरदस्तीने तिचा मोहनलाल चौधरी याच्याशी विवाह लावला.
दरम्यानच्या काळात पीडित तरुणीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली. पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आला.असे फियार्दीत म्हटले आहे. या तरुणीच्या नावे फेसबुक अकाऊंट तयार करत त्यावरून अश्लील फोटो पाठवून तिची बदनामी केली. तसेच पतीवरसुद्धा बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक ए.एन.धुमाळ याबाबत तपास करत आहे.