पिंपळे गुरवमध्ये ट्रकच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पाच वर्षाचा मुलगा जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 15:38 IST2017-11-08T15:34:51+5:302017-11-08T15:38:30+5:30
पिंपळे गुरव येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जात असताना एका विवाहितेचा मृत्यू झाला. महिला ट्रकखाली चिरडली तर पाच वषार्चा मुलगा रस्त्याच्या बाजूला फेकला गेला.

पिंपळे गुरवमध्ये ट्रकच्या धडकेत विवाहितेचा मृत्यू, पाच वर्षाचा मुलगा जखमी
पिंपरी : पिंपळे गुरव येथे ट्रकच्या धडकेत दुचाकीवरून जात असताना एका विवाहितेचा मृत्यू झाला. महिला ट्रकखाली चिरडली तर पाच वषार्चा मुलगा रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. तो किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. प्रज्ञा विक्रांत वाघमारे (वय ३०, रा. सुदर्शन नगर, पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. निलेश पंडित पठारे (वय २४, रा. खांडवी, अहमदनगर) असे ट्रक चालकाचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मृत झालेल्या प्रज्ञा यांचे बंधू पंकज विलास कांबळे (वय ४०) यांचा औंध येथे गॅस एजन्सीचा व्यवसाय आहे. ते गॅस एजन्सीच्या कामानिमित्त औंध, पिंपळेगुरव परिसरात दुचाकीवरून गेले होते. त्यावेळी त्यांची बहिण प्रज्ञा तेथे भेटली. तिने घरी सोडण्याची विनंती केली. बहीण प्रज्ञा व भाचा विहान यांना दुचाकीवर (एम एच १४ एफ एम ५३८४) बसवुन ते प्रज्ञा यांच्या घरी सुदर्शननगरला सोडण्यास जात होते. पिंपळेगुरव येथील सुदर्शननगर येथे जात असताना, या मार्गावर लक्ष्मीनगरजवळ जुनी सांगवी येथील रामकृष्ण मंगल कार्यालयालगतच्या रस्त्यावर (एमएच ४२ टी १४०२) या क्रमांकाच्या ट्रकची त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक बसली. बहिण प्रज्ञा दुचाकीवरून खाली पडली. त्याचवेळी पाठीमागून येणार्या ट्रकखाली ती सापडली. ट्रकचे चाक तिच्या अंगावरून गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाली. पाच वषार्चा विहान खाली पडला. तो या अपघातात किरकोळ जखमी झाला आहे. प्रज्ञाचे बंधू पंकज हे सुद्धा या अपघातात किरकोळ जखमी झाले, तरीही त्यांनी तातडीने बहिणीला रूग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. मात्र डोक्याला गंभीर इजा झाली असल्याने रूग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. त्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात या अपघाताबद्दल फिर्याद दिली आहे.