शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ; चोवीस तासांत विविध भागातून पळविल्या पाच दुचाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 12:44 IST

वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने वाहनचालक धास्तावले.

ठळक मुद्देसंबंधित पोलीस ठाण्यांमध्ये शनिवारी गुन्हे दाखल

पिंपरी : वाहनचोरटे सुसाट असून, शहरातील विविध भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये शनिवारी गुन्हे दाखल केले आहेत. वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत असल्याने वाहनचालक धास्तावले आहेत.

दत्तात्रय तुळशीराम फुले (वय ५०, रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची १५ हजार रुपये किमतीची दुचाकी नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखाली पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी ती दुचाकी चोरून नेली. 

गजानन केरबाजी घोडके (वय ३६, रा. आळंदी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी यांनी त्यांची २० हजारांची दुचाकी खडी मशीन रोड, चऱ्होली फाटा येथे एका झाडाजवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

महेश रामचंद्र पोकळे (वय २९, रा. घोरपडी), नितीन राजकपूर खंडारे (वय ३३, रा. जुनी सांगवी) आणि नवनाथ तुकाराम शिंदे (वय ३५, रा. पिंपरी) या तिघांनी दुचाकी चोरीप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोकळे यांची ५० जारांची दुचाकी सुदर्शन नगर, पिंपळे गुरव येथून चोरीला गेली. खंडारे यांची २५ हजारांची दुचाकी जयमाला नगर, जुनी सांगवी येथून चोरीला गेली. तर शिंदे यांची २५ हजारांची दुचाकी पिंपळे साैदागर येथून चोरीला गेली. 

चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरची चोरीचारचाकी वाहनांचे सायलेन्सर चोरीला गेल्याचे दोन प्रकार घडले. दामिनी तुषार सुरवाडकर (वय ३७, सध्या रा. इंद्रायणी नगर, भोसरी, मूळ रा. सावदा, ता. रावेर, जि. जळगाव) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सुरवाडकर यांच्या चारचाकीचा १२ हजारांचा सायलेन्सर चोरट्यांनी काढून चोरून नेला. प्रवीण दत्तात्रय पिंगळे (वय २६, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पिंगळे यांच्या चारचाकीचा एक हजार रुपये किमतीचा सायलेन्सर अज्ञात चोरट्यांनी काढून चोरून नेला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtwo wheelerटू व्हीलरtheftचोरीThiefचोर