Pune Crime | काळेवाडीत पिस्तुलाचा धाक दाखवून पावणेपाच लाखांचा ऐवज लुटला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 04:23 PM2022-03-22T16:23:57+5:302022-03-22T16:28:12+5:30

सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली

five lakhs were looted by showing fear of a pistol in kalewadi pune crime news | Pune Crime | काळेवाडीत पिस्तुलाचा धाक दाखवून पावणेपाच लाखांचा ऐवज लुटला

Pune Crime | काळेवाडीत पिस्तुलाचा धाक दाखवून पावणेपाच लाखांचा ऐवज लुटला

googlenewsNext

पिंपरी : व्यावसायिकाच्या डोक्याला पिस्तूल लावून दुकानातून फाॅर्मिंगचे दागिने, कामगारांचे मोबाईल, रोकड, असा चार लाख ६९ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने शहरात खळबळ उडाली. काळेवाडी येथे रविवारी (दि. २०) सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. 

मनसुखलाल घिसुलालजी राठोड (वय ५५, रा. एम्पायर इस्टेट, चिंचवड) यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. २१) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन ते चार अनोळखी चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे मुख्य रस्त्यावर फिर्यादीचे आर. के. गोल्ड नावाचे फाॅर्मिंगचे दागिने रिटेल व होलसेलचे दुकान आहे. आरोपी रविवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास फिर्यादीच्या दुकानात आले. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकी दिली. हाताने मारहाण केली. दुकानातून फाॅर्मिंगचे दागिने व फिर्यादी व कामगारांचे मोबाईल तसेच फिर्यादीच्या अंगावरील सोन्याचे दागिने, खिशातील व प्लास्टिकच्या बाॅक्समधून रोख रक्कम, असा चार लाख ६९ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हिसकावून घेतला. त्यानंतर फिर्यादीचे चारचाकी वाहन चोरी करून घेऊन गेले, असे फिर्यादीत नमूद आहे. सहायक पोलीस निरीक्षक संभाजी जाधव तपास करीत आहेत.

Web Title: five lakhs were looted by showing fear of a pistol in kalewadi pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.