मेल आयडी हॅक करून पाच लाखांची केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 15:24 IST2020-01-01T15:24:26+5:302020-01-01T15:24:57+5:30
मेल आयडी हॅक करून तसेच सर्जरीचे कारण सांगून फसवणूक

मेल आयडी हॅक करून पाच लाखांची केली फसवणूक
पिंपरी : मेल आयडी हॅक करून तसेच सर्जरीचे कारण सांगून अज्ञात इसमाने पाच लाखांची फसवणूक केली. १८ ते २० डिसेंबर २०१९ दरम्यान फसवणुकीचा हा प्रकार घडला.
अजित जनक कालिया (वय ४७, रा. प्राधिकरण निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मेल आयडी अज्ञात आरोपीने हॅक केला. त्यांना सर्जरीचे कारण सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून पाच लाख रुपये घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक केली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.