पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या पाच घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 08:04 PM2019-08-19T20:04:51+5:302019-08-19T20:04:59+5:30

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. एकाच दिवशी घरफोडीचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने, टीव्ही, कंपनीतील वायर, मोबाइल असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. 

Five incidents of burglary in Pimpri Chinchwad city | पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या पाच घटना

पिंपरी चिंचवड शहरात चोरीच्या पाच घटना

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. एकाच दिवशी घरफोडीचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने, टीव्ही, कंपनीतील वायर, मोबाइल असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. 


 बिरेंद्रसिंग धरमपाल कागडा (वय ३८, रा. शीतलनगर) यांचे आठ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल अज्ञात चोरट्याने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. १८) दुपारी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तळवडे येथे देहू-आळंदी रस्त्यावर एका घरातून चोरट्यांनी ३४ हजार रुपयाचे दागिने, एलईडी टीव्ही आणि रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी योगेश रामदास लोहोट (वय २५) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


 बंद घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून घरातून १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना रविवारी सकाळी तळेगाव दाभाडे येथील मधुबन साई सिटी येथे उघडकीस आली. याप्रकरणी बाळकृष्ण किणीकर (वय ५९) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भोसरी एमआयडीसीमध्ये असलेल्या एस़ एस़ इंजिनिअरिंग या कंपनीतून अज्ञात चोरट्यांनी वायर चोरून नेली. कंपनीच्या छताचा पत्रा उचकटून ३५ हजार २७५ रुपयांची कॉपरची वायर चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. १८) सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अजय राजापन्न पिल्ले (वय ५३) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.


   कामावरून घरी जात असलेल्या तरुणाचा ६ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला. ही घटना १३ आॅगस्ट रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास विश्वेश्वर चौक एमआयडीसी भोसरी येथे घडली. दयानंद बाबू पाटील (वय १९) या तरुणाने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Five incidents of burglary in Pimpri Chinchwad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.