शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

पिंपरीत पहिल्या दिवशी महापालिका शाळांत केवळ ३२ टक्के हजेरी; विद्यार्थी पालकांची अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2021 7:51 PM

मार्च महिन्यानंतर आज प्रथमच शाळेची घंटा वाजली..

पिंपरी : कोरोनाचा आलेख कमी झाल्याने शहरातील इयत्ता नववी ते बारावीच्या माध्यमिक शाळा आणि कनिष्ट महाविद्यालये सोमवारपासून सुरू झाली आहेत. महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयात केवळ विद्यार्थ्यांची ३२ टक्के हजेरी दिसून आली तर पालकांनी संमतीपत्रे भरून न दिल्याने खासगी शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबत अनास्था दिसून आली.

मार्चपासून कोरोना सुरू झाल्याने जुनपासून सुरू होणाºया शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यामुळे गेले सात महिने शाळा आणि महाविद्यालये आॅनलाईन सुरू होती. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा आलेख कमी झाल्याने राज्य सरकारने नववी ते बारावीच्या शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली होती. मात्र, शहरातील सत्ताधारी भाजपाने त्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे गेले दोन महिने शाळा सुरू झालेल्या नव्हत्या. तिसऱ्या टप्यात ४ जानेवारीपासून पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील शाळा सुरू करण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले. त्यानुसार आजपासून शाळा सुरू झालेल्या आहेत. महापालिकेची अठरा माध्यमिक विद्यालये आजपासून सुरू झाली. तर काही खासगी संस्थांनीही शाळा सुरू केल्या आहेत. मात्र, पहिल्या दिवशी उपस्थिती अत्यल्प असल्याचे दिसून आले.

.........अशी घेतली जातेय दक्षता१) महापालिकेच्या वतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात नियमावली तयार केली आहे. त्यानुसार शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. शाळांना निर्जुंतुकीकरणाची व्यवस्था करण्याचे सुचविले होते. त्यानुसार शाळांमध्ये पहिल्या दिवशी  मुलांचे तापमान तपासणी, आॅक्सीजन तपासणी करण्यात आली. तसेच स्वच्छतागृहे आणि साबण आणि सॅनिटायजर ठेवण्यात आले होते.२) वर्गखोली आणि स्टाफरुममध्ये फिजिकल डिटन्स दिसून आले. वर्गखोल्यांतील बाकांवर मुलांची एकआड एक बसण्याची व्यवस्था केली होती. पहिल्या दिवशी फिजीकल डिस्टन्स दिसून आले.////////////////

मुख्याध्यापकांवरही जबाबदारीशाळा सुरू करताना शाळा व्यवस्थापक असणाºया मुख्याध्यापक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विभागप्रमुखांना पत्र पाठविले आहे. महापालिकेने कोवीड संदर्भात घालून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही, याबाबत देखरेख करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर दिली आहे. शिक्षकांचा कोवीड अहवाल शाळेच्या दप्तरी ठेवावे, शाळा परिसरात विद्यार्थी मास्कचा वापर करीत आहेत की नाहीत.मार्गदर्शक फलक लावणे, तसेच प्रार्थनेच्या वेळी किंवा खेळाच्या मैदानावर विद्यार्थी फिजिकल डिस्टन्सचे पालन करतात की नाही, यावर देखरेख करणे, तसेच शाळेचा परिसर दररोज स्वच्छ करतो की नाही. स्वच्छतागृहे नियमितपणे स्वच्छ होतात की नाही. तसेच शाळेतील वर्ग स्वच्छ करण्याविषयीचे नियंत्रण मुख्याध्यापकांकडे दिले आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षितप्रवासासाठी वाहनांची दोनदा स्वच्छता करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत.  

   ........शाळेचे नाव,           उपस्थिती,     टक्केवारी१) केशवनगर शाळा     ६७               २१.७३२) संततुकारामनगर     १८                ३९.१३३) पिंपरीनगर             १८               २६.२८४) काळभोरनगर         ५७                २६.४९५) कासारवाडी          १८                ६७.९२६) पिंपळेगुरव           २३४             ३६.४०७) फुगेवाडी              ३१               ३२.२९८) निगडी।                ८५               ३१.३०९) वाकड                 ३३               २१.१०१०) खराळवाडी।        ५२              ५४.६९११) भोसरी               ८२               ३५.३४१२) थेरगाव              २७२             ४०.००१३) पिंपळेसौदागर     १४५            ५०.८४१४) नेहरूनगर          ४८               ६.७६१५) आकुर्डी (उर्देू)     २७।             २५.००१६) रुपीनगर           ४७               ६.६५१७) लांडेवाडी           ४६              ४२.७०१८) क्रीडा प्रबोधिणी   ४०             ४०.४५........................................एकुण                ////१३३५            ३२.५०      

..................रुपीनगर, नेहरूनगरात कमी तरकासारवाडीत सर्वाधिक उपस्थितीमहापालिका क्षेत्रात महापालिकेची १८ माध्यमिक विद्यालये आहेत. त्याठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी रुपीनगर, नेहरूनगरातील शाळेत ६ टक्के उपस्थिती होती. तर कासारवाडीतील शाळेत सर्वाधिक ६७.९२ टक्के उपस्थिती होती.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbhosariभोसरीpimpale guravपिंपळेगुरवSchoolशाळाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्या