शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

कोरेगाव भीमा दंगलीतील नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 01:51 IST

शिरूर तहसीलदारांकडे ८ कोटींचा निधी वर्ग

कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे १ जानेवारी रोजी उसळलेली दंगल व त्याचे सणसवाडी परिसरात उद्भवलेले पडसाद यामुळे या भागात तब्बल ९ कोटी ४८ लाख ५५ हजार ७६५ रुपयांचे नुकसानभरपाईचे पंचनामे करण्यात आले होते. मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगलीतील नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई देणार असे स्पष्ट केले होते. त्यानुसार ७ कोटी ९७ लाख ९० हजार ६७० रुपयांचा निधी तहसीलदार शिरूर यांच्याकडे जमा झाला आहे. दंगलीतील नुकसानग्रस्तांना त्याचे थोड्याच दिवसांत वितरण करण्यात येणार असल्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

१ व २ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे दोन गटांतील संघर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे नुकसान झाले होते. दंगलीमध्ये झालेल्या नुकसानीचे पंचानामे करण्यासाठी शिरूर तहसीलदार रणजित भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार शेख यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली होती. यामध्ये महसूल विभागाचे मंडल अधिकारी, ग्रामसेवक आणि पोलीस प्रशासनाच्या प्रतिनिधींचा समावेश होता. तीन जणांच्या विविध पथकांनी पंचनामे जिल्हा प्रशासनाला सादर केले. त्यानुसार या दंगलीमध्ये झालेल्या दगडफेक, तोडफोड, जाळपोळीमध्ये ९ कोटी ४८ लाख ५५ हजार ७६५ रुपयांचे नुकसानीचे पंचनामे तयार करण्यात आले. यामध्ये ११६ चारचाकी वाहने, ९५ दुचाकी, १८ घरे, तीन बस, १ अग्निशमन वाहन, ८ ट्रक, १ जेसीबी, ७६ हॉटेल आणि १४ गॅरेजचा समावेश होता. नुकसान झालेल्या स्थानिक नागरिकांसह बाहेरून आलेल्या नुकसानग्रस्त वाहनांचेही पंचनामे केले होते. नंबरप्लेट, चासी नंबरवरून वाहनमालकांचा शोध घेण्यात आला होता. नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत सदर रक्कम जुलै २०१८ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये मंजूर करण्यात येऊन ३ आॅगस्ट २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली. ६ आॅगस्ट रोजी ७ कोटी ९७ लाख ९० हजार ६७० रुपयांचा निधी तहसीलदार शिरूर यांच्याकडे जमा झाला आहे.शासनामार्फत देण्यात येणारी रक्कम रोख स्वरूपात न देता नुकसानग्रस्तांच्या थेट बँक खात्यावर ३१ जानेवारी २०१९ पूर्वी जमा करण्याचे स्पष्ट आदेश शासनाने प्रशासनाला दिले असल्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड