The fifth phase of lockdown in Pimpri Chinchwad starts from tomorrow; The salon that started, the parlor will close | पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू; कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार

पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरू; कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार

ठळक मुद्देपाचव्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहराचा नॉन रेड झोनमध्ये समावेश

पिंपरी : केंद्र व राज्यशासनाच्या निर्देशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रासाठी लॉकडाऊन पाचबाबत आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी रविवारी रात्री दहाला जारी केले आहेत. त्याची अंमलबजावणी येत्या १ जूनपासून करण्यात येणार आहे. नवीन आदेशानुसार लॉकडाऊन चारमध्ये सुरू केलेली सलून आणि पार्लर बंद करण्यात येणार असून कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध कायम राहणार आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दि. ०१ जूनपासुन दिनांक ३० जूनपर्यंत वाढविला आहे. विषाणू चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. पाचव्या टप्प्यात पिंपरी चिंचवड शहराचा समावेश नॉन रेड झोनमध्ये केला आहे.
 ...........
शहरात या गोष्टींना राहणार बंदी
१)  विमानसेवा, मेट्रो,  शाळा, कॉलेज , शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट,  सिनेमा हॉल , शॉपींग मॉल, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बार , सर्व प्रकारचे सभागृह, नाट्यगृह, मनोरंजन पार्क आणि सर्व प्रकारचे सामाजिक , धार्मिक , राजकिय, क्रीडा ,  मनोरंजन , सांकृतिक , शैक्षणिक उपक्रम , सभा संमेलन व तत्सम मोठ्या संख्येने लोक एकत्र येऊ शकतील अशा प्रकारचे कार्यक्रम होणार नाहीत.
2) सर्व धार्मिक स्थळे , सर्व धार्मिक कार्यक्रम , सभा , संमेलने बंद राहतील.
३) मागील आठवड्यात सर्व केश कर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स सुरू केली होती, ती पुन्हा बंद केली आहेत.
 ४)  अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय सेवा या कारणांशिवाय रात्री ९ ते सकाळी ५  या कालावधीत संचार बंदी के। राहणार आहे
५) ६५ वर्षावरील सर्व व्यक्ती, अति जोखमीचे आजाराच्या व्यक्तींना घराबाहेर पडता येणार नाही
 .......................
या गोष्टी राहणार सुरू

१)  क्रीडा संकुले, स्टेडियम यांचे बाह्य भाग व खुली सार्वजनिक ठिकाणे नागरिकांसाठी खुली राहतील. सकाळी ५  ते सायंकाळी ७ पर्यंत असेल. 
२)  प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रात पि एम पि एम एल च्या बस ५० टक्के एवढ्या क्षमतेने प्रवाशांची वाहतुक करता येईल. 
३) बाजारपेठातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान सुरु राहतील. मटण व चिकन विक्रीची दुकाने यापूर्वी   जाहीर केलेल्या तीन दिवसांऐवजी दररोज सकाळी९ ते ५ या वेळेत सुरू राहतील.

.....................
प्रतिबंधित क्षेत्रात मनपाद्वारे चालविण्यात येणारी अथवा परवानगी दिलेली फिव्हर क्लिनीक वगळता अन्य बाह्यरुग्ण विभाग व खाजगी वैद्यकीय दवाखाने सुरु ठेवण्यास प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
............... 
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या बॅकींग सुविधांसाठी सर्व बँकांनी शाखा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते दुपार २ या वेळेत सुरु ठेवाव्यात तसेच आपली ए.टी.एम.केंद्रे पुर्णवेळ कार्यान्वीत ठेवावीत.
..........
प्रतिबंधित क्षेत्रात  सकाळी १०  ते दुपारी २ या कालवधीतच दुध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील.
 .........
कंटेनमेंट क्षेत्रात अत्यावश्यक इतर सामान जसे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू यांची किरकोळ विक्री सुद्धा  सकाळी १० ते दुपारी २ या कालवधीतच सुरु राहिल.
 
 .............
कंटेनमेंट झोन वगळता उर्वरित भाग
  पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील उक्त आदेशातील प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्य क्षेत्रातील सर्व प्रकारचे दवाखाने, इस्पितळे, क्लिनिक, प्रसुतीगृहे व औषधी दुकाने यांना सदर आदेशातुन वगळण्यात येत असुन ती संपुर्ण कालावधीकरीता खुली राहतील.
 .........
 जीवनावश्यक तथा अन्य वस्तूंचे औषधांचे व तयार अन्न पदाथार्चे घरपोच वाटप सकाळी ८ ते रात्री १० या कालवधीतच मनपाच्या पूर्व मान्यतेने पास घ्यावा लागेल. 
................
 
असे आहेत निर्बंध : 
1) सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक राहील.
2) सार्वजनिक ठिकाणी थुंकणेस सक्त मनाई आहे आणि त्याचे उल्लंघन केल्यास दंड होणार.
3) सार्वजनिक ठिकाणी दोन फूट इतके अंतर राखणे बंधनकारक राहील.
4) लग्न समारंभामध्ये सामाजिक अंतर राखून जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील.
5) अंत्यविधी कार्यक्रमासाठी सामाजिक अंतर राखून जास्तीत जास्त ५० व्यक्तींना परवानगी राहील.
6) सार्वजनिक ठिकाणी गुटखा, पान तंबाखू  खान्यास व मद्यपानास सक्त मनाई राहील.
7) सर्व दुकानामध्ये दोन्ही ग्राहकामध्ये सुरक्षित अंतर ६ फुट राखणे बंधनकारक राहील.
8) सर्व कार्यालये , दुकाने , कारखाने, व्यापारी आस्थापना इत्यादी ठिकाणी कामाच्या वेळेचे सक्त पालन करावे.
9) इमारतींमध्ये आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंग , हात धुणे, सॅनिटायझरचा वापर या करिता व्यवस्था करणेत यावी.
10) संपुर्ण कार्यालयामधील  सार्वजनिक जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग जसे की दाराचे हॅन्डल इत्यादीचे  वेळोवेळी निजंर्तुकीकरण करावे.

Web Title: The fifth phase of lockdown in Pimpri Chinchwad starts from tomorrow; The salon that started, the parlor will close

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.