शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ताथवडेत दोन चिमुकल्यांचा खून करत पित्याची आत्मह्त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 17:24 IST

ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोघा मुलांना गळफास लावला, त्यात मुले आणि पित्याचा मृत्यू झाला. 

ठळक मुद्देआत्महत्तेचे कारण अद्याप अस्पष्ट

पिंपरी-चिंचवड : ताथवडे येथील नृसिंह कॉलनीत जन्मदात्या पित्यानेच पोटच्या दोघा मुलांचा गळा आवळून खून करत स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि १७) रोजी दुपारी एकच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. दीपक बर्मन (वय ३५, रा. नृसिंह कॉलनी ताथवडे, मूळ- पश्चिम बंगाल) असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव असून शुभम दीपक बरमन (वय १०) व रूपंम दीपक बरमन (वय ८) असे खून झालेल्या मुलांची नावे आहेत.         याबाबत वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्मन कुटुंबीय ताथवडे येथे संजय ढगे यांच्या खोलीत भाड्याने वास्तव्यास होते. दीपक बर्मन हा सुरक्षा रक्षकाचे काम करायचा तर त्याची पत्नी मालती ह्या देखील जवळच्याच कंपनीत नोकरी करतात. दुपारी घरी शाळेतून आलेली दोन व दीपक हे तिघेच होते. दरम्यान, आधी दीपक याने आपल्या दोन्ही मुलांचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी एक वाजता पत्नी मालती ह्या घरी जेवायला आल्या असता त्यांना पती दीपक यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. बाजूला चिमुकली मुले निपचित पडली होती हे पाहून भांबावलेल्या मालती यांनी आरडा ओरड करताच शेजारी जमा झाले. यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. दोन्ही मुलात त्राण असून ते जगतील या आशेने त्यांना तत्काळ पिंपरीतील वाय सी एम रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.       मोठा शुभम आणि लहान रूपंम हे दोघेही येथील बाल सेवा इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये सहावी व चौथीत शिकत होती.  दोन्हीही गोड मुलांचा जन्मदात्या पित्यानेच खून केल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि सर्वांचे मन सुन्न झाले. जो तो या मुलांसाठी हळहळ व्यक्त करत होता. आत्महत्येमागे नेमके कारण काय ? याचा पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :wakadवाकडDeathमृत्यूPoliceपोलिसMurderखून