पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून बाप- लेकावर सात जणांनी केला खुनी हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 20:52 IST2020-02-25T20:52:03+5:302020-02-25T20:52:53+5:30

पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून सात जणांनी वडिलांना तलवारीने व मुलाला लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारत जीवघेणा हल्ला केला. ही घटना सूस येथील ननावरे वस्तीमध्ये घडली.

Father- son beaten by seven persons | पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून बाप- लेकावर सात जणांनी केला खुनी हल्ला

पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून बाप- लेकावर सात जणांनी केला खुनी हल्ला

पिंपरी : पोलिसांत तक्रार दिल्याच्या कारणावरून सात जणांनी वडिलांना तलवारीने व मुलाला लाकडी दांडके व लोखंडी रॉडने मारत जीवघेणा हल्ला केला. ही घटना रविवारी रात्री आठ वाजता सूस येथील ननावरे वस्तीमध्ये घडली. या प्रकरणी परस्परविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशिकांत कचरे, विकास कचरे, राखी कचरे, चैताली विकी कचरे, कामिनी धुमाळे (सर्व रा. ननावरे वस्ती, सूस, ता. मुळशी), सोन्या आणि महेंद्र (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 टिना रशिकांत कचरे (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी टिना यांच्या मुलाचे आणि आरोपींसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्याबाबत टिना यांनी  तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून टिना यांना शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. आरोपींनी टिना यांच्या पतीला तलवारीने तर मुलाला कु ºहाडीने, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात टिना यांचे पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. 

दरम्यान, राखी शशिकांत कचरे (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रशिकांत सोपान कचरे, तुषार रशिकांत कचरे आणि अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी राखी यांच्या मुलाला शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले.

Web Title: Father- son beaten by seven persons