भोसरीत भीषण अपघात; चारचाकीच्या धडकेने पादचारी वृद्धाचा मृत्यू
By नारायण बडगुजर | Updated: August 29, 2023 17:21 IST2023-08-29T17:20:21+5:302023-08-29T17:21:35+5:30
सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली...

भोसरीत भीषण अपघात; चारचाकीच्या धडकेने पादचारी वृद्धाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव चारचाकी वाहनाने धडक दिल्याने पादचारी वृद्धाचा मृत्यू झाला. इंद्रायणी चौक, इंद्रायणी नगर, भोसरी येथे रविवारी (दि. २७) सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली.
कांतीलाल भाऊराव कदम (वय ७८, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी कांतीलाल यांच्या मुलीने सोमवारी (दि. २८) एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल जोसेफ लोंढे (वय ३४, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांतीलाल कदम हे इंद्रायणी नगर, मधील इंद्रायणी चौकात रविवारी सकाळी पायी चालत जात होते. ते रस्ता ओलांडत असताना भरधाव आलेल्या चारचाकी वाहनाने कदम यांना धडक दिली. त्यात त्यांच्या डोक्याला, कपाळाला, दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत नमूद आहे.