शहरं
Join us  
Trending Stories
1
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
2
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
3
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
4
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
5
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
6
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
8
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
9
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
10
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
11
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
12
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
13
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
14
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
15
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
16
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
17
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
18
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
19
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
20
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया

मावळातील ‘फार्म हाऊस’ ठरताहेत गुन्हेगारांसाठी अवैध धंद्यांचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 6:19 AM

ग्रामीण भागातील ‘फार्म हाऊस’चा वापर गुन्हेगार, तसेच काही राजकीय मंडळी बहुउद्देशीय केंद्र म्हणून करू लागली आहेत. खेड्यालगतच्या आणि गावच्या लोकवस्तीपासून काही अंतर दूर असलेल्या फार्म हाऊसमध्ये अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकार घडू लागले आहेत.

- संजय मानेपिंपरी : ग्रामीण भागातील ‘फार्म हाऊस’चा वापर गुन्हेगार, तसेच काही राजकीय मंडळी बहुउद्देशीय केंद्र म्हणून करू लागली आहेत. खेड्यालगतच्या आणि गावच्या लोकवस्तीपासून काही अंतर दूर असलेल्या फार्म हाऊसमध्ये अनेक गुन्हेगारी स्वरुपाचे प्रकार घडू लागले आहेत.नोव्हेंबरमध्ये चाकणजवळील एका फार्म हाऊसमध्ये गुन्हेगारांनी पिस्तूल, गावठी कट्टे ठेवले असल्याचे चाकण पोलिसांना आढळून आले होते. ही घटना ताजी असताना, मावळातील फळणे गावालगतच्या फार्म हाऊसवर बारबालांवर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. अशा प्रकारे विविध गुन्हेगारी कृत्यांसाठी फार्म हाऊस उपयोगात आणली जात असल्याचे निदर्शनास आले आहे.शेतातील घर अशा संकल्पनेतून फार्म हाऊस साकारले जात असले, तरी निर्जन आणि लोकवस्तीच्या काही अंतर दूर असलेल्या फार्म हाऊसचा वापर नको त्या कामांसाठी सर्रासपणे केला जात आहे. शहरातील काही बड्या राजकीय नेत्यांची, उद्योजकांची, व्यावसायिकांची अशी फार्म हाऊस आहेत. एरवी ओसाड पडणाऱ्या या ‘फार्म हाऊस’च्या दिशेने अचानक कधी तरी महिना-दोन महिन्यांतून मोटारींचा ताफाआलेला गावकºयांना पहावयास मिळतो. शांत, नीरव वातावरण असलेल्या खेड्यांमध्ये कधी तरीफार्म हाऊसमधून गाण्यांचा आवाज येतो. डीजेच्या तालावर ठेका धरलेल्या तरुण-तरुणींचा आरडाओरडा ऐकू येत असतो. शहरातील डान्स बारमधील छमछम फार्म हाऊसच्या निमित्ताने गावकºयांच्या कानावर पडते; परंतु प्रत्यक्षात फार्म हाऊसमध्ये आतकाय घडते, याचा थांगपत्ता त्यांना लागत नाही.कोणाचेही नाही नियंत्रणअसाच प्रकार वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंदर मावळातील फळणे गावात दोन दिवसांपूर्वी घडला. पनवेलच्या डान्स बारमध्ये नाचणाºया बारबाला शुक्रवारी रात्रीच्या अंधारात गावातील पायवाटांनी पळत असल्याचे दृश्य काही ग्रामस्थांना पहावयास मिळाले. पिस्तूल रोखून पाठलाग करणाºया आरोपींच्या तावडीतून सुटका करण्यासाठी संकटात सापडलेल्या या बारबाला गावातील तरुणांकडे मदतीची याचना करीत होत्या.वडगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बारबालांची सुखरूप सुटका केली. मात्र या घटनेमुळे फार्म हाऊसच्या गैरवापराचा मुद्दा चर्चेत आला आहे.तसेच, या भागातील फार्म हाऊसवर कोणत्याही शासकीय यंत्रणेचे नियंत्रण नाही. त्यामुळे पोलिसांनी यापुढे फार्म हाऊसवर करडी नजर ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.पिस्तूल साठ्यासाठी उपयोग...पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना नोव्हेंबरमध्ये भोसरी पोलिसांनी अटक केली. पिस्तूल विक्रीच्या गुन्ह्यात वारंवार ते पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता, उत्तर प्रदेशमधून विक्रीसाठी आणलेले पिस्तूल चाकणजवळील एका फार्म हाऊसमध्ये लपवून ठेवल्याची माहिती आरोपींनी दिली. भोसरी आणि चाकण पोलिसांनी फार्म हाऊसची तपासणी केली असता, त्यांना सात पिस्तूल त्या ठिकाणी आढळून आली. फार्म हाऊसचा वापर बेकायदा पिस्तूल साठा करण्यासाठी केला जात असल्याचे त्या घटनेमुळे निदर्शनास आले होते.गुन्ह्यांचे रचले जातात कट१) गुन्हेगारी कारवायांसंबंधीची चर्चा, नियोजन करण्यासाठी अनेकदा गुन्हेगार फार्म हाऊसचा उपयोग करतात. खून, दरोडा अशा गुन्हेगारी कृत्यांचा कट अशाच ठिकाणी रचला जातो. अमली पदार्थ, बेकायदा शस्त्रसाठा करण्यासाठीही फार्म हाऊसचा राजरोसपणे वापर केला जात आहे, ही बाब निदर्शनास आली आहे. फार्म हाऊसचा वापर कशासाठी केला जात आहे, याबद्दल फार्म हाऊसचे मालक अनभिज्ञ असतात, की त्यांची त्यास मूकसंमती असते, अशीही शंका उपस्थित केली जात आहे.

गुन्हेगारांचे होतेय आश्रयस्थान२) गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत असतात. हे फरार झालेले आरोपी फार्म हाऊसचा आश्रय घेतात. राजकारणात सक्रिय, पण गुन्हेगारी पार्श्वभूमीअसलेले काही आरोपी पोलिसांचा ससेमिराचुकविण्यासाठी फार्म हाऊसचा आधार घेतात. वेगवेगळ्या फार्म हाऊसमध्ये ते अनेक दिवस काढतात. राजकारणी आणि गुन्हेगार यांचे सलोख्याचे संबंध असलेल्या व्यक्ती फार्म हाऊसमध्ये आसरा घेऊन पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरतात.

टॅग्स :mavalमावळ