खासगी वाहनामध्ये पोलीस साहित्य बाळगणाऱ्या तोतया पोलिसास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 16:27 IST2019-09-01T16:25:03+5:302019-09-01T16:27:59+5:30
पोलीस खात्यामध्ये नोकरीस नसतानाही पोलिसांचे साहित्य खासगी वाहनामध्ये ठेवल्यावरून एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई राधा हॉटेल चौक म्हाळुंगे येथे शनिवारी (दि. ३१) पहाटे करण्यात आली.

खासगी वाहनामध्ये पोलीस साहित्य बाळगणाऱ्या तोतया पोलिसास अटक
पिंपरी : पोलीस खात्यामध्ये नोकरीस नसतानाही पोलिसांचे साहित्य खासगी वाहनामध्ये ठेवल्यावरून एकाला अटक करण्यात आली. ही कारवाई राधा हॉटेल चौक म्हाळुंगे येथे शनिवारी (दि. ३१) पहाटे करण्यात आली.
सुदेश शिवाजी नवले (वय ३७, रा. वाल्हेकरवाडी चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई विकास रामदास सानप यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुदेश पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलामध्ये कुठेही नोकरीस नाही. तसेच तो कोणत्याही सरकारी शाखेत नोकरीस नाही. तरीही त्याने स्वत: पोलीस असल्याचे भासविण्यासाठी खासगी वाहनामध्ये (एम एच १४ / जी एस ४३३६) पोलिसांचा मोनोग्राम असलेला चामडी बेल्ट, पोलीस मोनोग्राम असलेली टोपी व पोलीस नावाचा लाल रंगाचा इंग्रजी अक्षरांचा फलक असे साहित्य ठेवले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.