शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

ग्रामविकास सोसायटीच्या मतदार यादीत बनावट नाव; भाजपच्या नेत्याला अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 5:50 PM

न्यायालयाने सुनावली २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी...

वडगाव मावळ : विकास सोसायटीच्या मतदार यादीत बनावट नाव नमूद करून बनावट ठराव करून घेतल्या प्रकरणी भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब नेवाळे यांच्यावर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यानंतर नेवाळे यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

सन २०१५ मध्ये गोवित्री ग्राम विकास सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निवडणुकी करता बनवण्यात आलेल्या मतदारयादीमध्ये बाळासाहेब नेवाळे यांच्या सांगण्यावरून सोसायटीचे सभासद नसलेले प्रकाश गायकवाड व बाळू आखाडे यांचे नाव नमूद केले आणि त्यांचा बनावट सभासद नंबर टाकून आणि ती बनावट मतदार यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांना सबमिट केली. त्याचबरोबर दिनांक २४ डिसेंबर २०१९  रोजी जिल्हा बँकेच्या सभासद पदाच्या निवडी करिता सोसायटीकडून पाठवण्यात येणारा एक उमेदवार स्वतः बाळासाहेब नेवाळे आहेत, असा संचालकांची मीटिंग घेऊन प्रस्ताव तयार करून सदरचा बनावट व खोटा प्रस्ताव सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे सबमिट केला. त्यामुळे त्यांच्यावर व इतर तिघांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम हे करत आहे  

नेवाळे एकेकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्येही त्यांना कोणते महत्वाचे पद मिळाले नाही. मावळ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके विजयी झाले. तेव्हापासून त्यांचे राजकीय वजन कमी झाले.दोन महिण्यापूर्वी त्यांनी जिल्हा बॅंकेच्या संचालक पदाचा राजीनामा देखील दिला. त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊ नये यासाठी अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील सांगितले आहे. 

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटक