बनावट नोटा चलनात आणणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:19 IST2018-09-11T18:19:14+5:302018-09-11T18:19:29+5:30

पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्याना भोसरी पोलिसांनी अटक केली. दोघांकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा जप्त केल्या.

The fake currency notes are fake | बनावट नोटा चलनात आणणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात 

बनावट नोटा चलनात आणणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात 

पिंपरी : पाचशे रुपयाच्या बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा भामट्याना भोसरीपोलिसांनी अटक केली. दोघांकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा जप्त केल्या. याप्रकरणी भोसरीपोलिसांनी दोघांना अटक खडकी न्यायालयात हजर केले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी दापोडी येथे फळ विक्रेत्याला पाचशेची न दिली. ५० रुपयांची फळे घेतली. ४५० रुपये त्यांना परत द्यायचे होते. फळ विक्रेता सुटे पैसे घेण्यासाठी आजूबाजूच्या दुकानदारांकडे पाचशेची नोट घेऊन गेला. मात्र नोट बनावट असल्याचा संशय येताच त्यांनी सुटे पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी नोट बनावट असल्याचे फळविक्रेत्याच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपींना बनावट नोटांसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाचशे रुपयांच्या सहा नोटा असे ३ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. भोसरी पोलीस तपास करीत आहेत. 


 

Web Title: The fake currency notes are fake