पिंपरी महापालिकेच्या मदतीने दररोज ३० हजार लोकांना मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 08:28 PM2020-04-07T20:28:49+5:302020-04-07T20:35:30+5:30

कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या लॉकडाऊन सुरू

Every day 30 thousands people help by Pimpri Municipal Corporation | पिंपरी महापालिकेच्या मदतीने दररोज ३० हजार लोकांना मदतीचा हात

पिंपरी महापालिकेच्या मदतीने दररोज ३० हजार लोकांना मदतीचा हात

Next
ठळक मुद्देगरजू नागरिकांना अन्न आणि शिधा स्वयंसेवी संस्थांच्या सहकायार्तून विविध भागात दररोज वाटपदिव्यांग, कामगार व विद्यार्थ्यांना घरपोच जेवण देणे अथवा न देण्याचे अधिकार संबंधित संस्थेचे

पिंपरी : कोरोना विषाणू संसगार्मुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवली आहे. या कालखंडामध्ये शहरातील गरजू व्यक्तींपर्यंत अन्न आणि शिधा पोहचविण्यासाठी महापालिका स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समन्वय साधत आहे. या कार्यात सहभागी झालेले स्वयंसेवक स्वत:ची काळजी घेऊन प्राप्त परिस्थितीमध्ये आपले योगदान देत आहेत. या यंत्रणेव्दारे शहरातील विविध भागातील सुमारे २९,९५३ गरजू व्यक्तींना डब्बे व फूड पॅकेटमार्फत अन्न वाटप करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली.
     कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सध्या लॉकडाऊन सुरू आहे. अशा परिस्थितीत गरजू नागरिकांना अन्न आणि शिधा स्वयंसेवी संस्थांच्या सहकायार्तून शहरातील विविध भागात दररोज वाटप करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करून या प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे.
विश्व हिंदू परिषद, इस्कॉन, बजरंग दल, लक्ष्य फाउंडेशन, राकेश वाकोर्डे फाउंडेशन, समप्रिय, पीसीसीएफ, पोलीस मित्र नागरिक संघटना, अग्रसेन संघटना, शिवभोजन, संस्कार सोशल फाउंडेशन, धर्म विकास संस्था सहभागी झाल्या आहेत. रोजगार नसणाऱ्या अथवा स्थलांतरित मजुरांसाठी ३११ ठिकाणी निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्यामध्ये २१३ नागरिक राहत असून त्यांनाही निवारा व भोजनासह तपासणीची सुविधा केली आहे.
अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उर्दू शाळा खंडोबामाळ, आकुर्डी येथे ७८, ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत केशवनगर विद्यालय येथे ३६, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पिंपळे सौदागर येथील अण्णासाहेब मगर विद्यालय येथे २१, इ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत छत्रपती शिवाजीमहाराज विद्यालय, भोसरी येथील संकुलात ४३, ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत दापोडी येथील हुतात्मा भगतसिंग विद्यालय येथे १८, तर पिंपरी येथील रात्र निवारा केंद्रात १७ असे एकूण २१३ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था केली  आहे.

दिव्यांग, मजूर, कामगारांनाही मदत
 कोरोनाचा  विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन चालू आहे. अशा परिस्थितीत उदरनिवार्हाचे साधन नसणाºया गरजू पिंपरी-चिंचवड शहरातील दिव्यांग, मजूर, कामगार, व विद्यार्थ्यांना घरपोच मोफत भोजन देण्यासाठी जनकल्याण समिती व श्री काळभैरवनाथ उत्सव समिती या स्वयंसेवी संस्था पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समन्वयातून कार्यरत आहेत. शहरातील गरजूंना याचा लाभ देण्यात येणार असल्याने अशा गरजू व्यक्तींनी चिंचवडसाठी ९५५२५७८७२६, भोसरीसाठी ८६०५७२२७७७, आकुडीर्साठी ८६०५४२२८८८, पिंपळे सौदागरसाठी ७८८७८६८५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
अजित पवार म्हणाले, दिव्यांग, मजूर, कामगार, व विद्यार्थ्यांना घरपोच जेवण देणे अथवा न देण्याचे अधिकार संबंधित संस्थेचे असल्याची नोंद संबंधितांनी घ्यावी. सोमवारपासून मोफत भोजन पुरविण्याची सुविधा कार्यान्वित होणार आहे.

Web Title: Every day 30 thousands people help by Pimpri Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.