शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Pimpri Chinchwad: पावसाळ्यातही पिंपरी चिंचवडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत! 'या' भागात पाणीपुरवठा बंद

By विश्वास मोरे | Updated: September 2, 2024 12:55 IST

नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, क्षेत्रीय कार्यालयाचे आवाहन

पिंपरी : पिंपरी चिंचवड आणि  मावळ परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र, शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे. मंगळवारी आणि बुधवारी शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे. महापालिका ई क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या भोसरी, शांतीनगर, संत तुकाराम नगर, दिघी, बोपखेल, मॅगझीन, वडमुखवाडी (काही भाग), गजानननगर, बी.यु.भंडारी, इंद्रायणीनगर टाकी परिसरातील पाणीपुरवठा ३ सप्टेंबर २०२४ रोजी बंद राहणार आहे. तसेच ४ सप्टेंबर २०२४ रोजी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार असल्याची माहिती ई क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी यांनी दिली आहे.

थरमॅक्स चौकात गळती  थरमॅक्स चौक येथे महानगरपालिकेच्या मुख्य जलवाहिनीतुन मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम मंगळवार ३ सप्टेंबर रोजी करण्यात येणार असल्याने भोसरी, शांतीनगर, संत तुकाराम नगर, दिघी, बोपखेल, मॅगझीन, वडमुखवाडी (काही भाग), गजानननगर, बी.यु.भंडारी, इंद्रायणीनगर टाकी परिसरात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुरूस्तीच्या कामामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार ४ सप्टेंबर रोजी होणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे.

पाणी जपून वापरा 

 नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन ई क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीSocialसामाजिकMuncipal Corporationनगर पालिकाRainपाऊस