शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

दापोडीत दोन हजार कोटी खर्चून निर्माण होणार सात हजार घरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 12:58 AM

शहर सुधारणा समिती : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत इमारती

पिंपरी : महापालिकेच्या वतीने दापोडीतील जयभीमनगरमधील झोपडपट्टीधारकांचे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पुनर्वसन केले जाणार आहे. त्याकरिता ३६ इमारतींमध्ये एकूण ७ हजार १४३ सदनिका बांधण्याच्या सुधारित खर्चाच्या उपसूचनेला शहर सुधारणा समितीच्या सभेत मान्यता दिली आहे. यासाठी १ हजार ९५७ कोटी खर्च केले जाणार आहेत. यामध्ये जमीन मालकाकडून ही जमीन खरेदी केली जाणार असून, त्यासाठी २०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. अध्यक्षस्थानी सभापती सीमा चौगुले होत्या.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत ७१ झोपडपट्ट्या असून, आतापर्यंत महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएमअंतर्गत ९ गृहप्रकल्प राबविले आहेत. प्रकल्प राबविण्या व्यतिरिक्त अन्य झोपडपटट्यांसाठी एम. एम. प्रोजेक्ट कन्सल्टंटने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सादर करून त्याचे सादरीकरण केले आहे. मात्र, महापालिका हद्दीत प्रायोगिक तत्त्वावर क्लस्टरवाईज झोपडपट्ट्यांची विभागणी करून प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले आहे. त्याकरिता अन्य झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाकरिता या सल्लागाराने सुमारे तीन हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. या सल्लागाराने क्लस्टर एकमध्ये भाटनगर पुनर्निर्माण प्रकल्प व क्लस्टर दोनमध्ये दापोडी येथील सिद्धार्थनगर, जयभीमनगर, गुलाबनगर, महात्मा फुलेनगर, लिंबोरेवस्ती या झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. दुसऱ्या क्लस्टरमधील झोपडपट्ट्यांचा पुनर्वसन अहवाल सादर करण्याचा प्रस्तावासह १ हजार ९५७ कोटींच्या सुधारित खर्चाची उपसूचना मंजूर केली आहे. हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत प्रकल्पातील लाभार्थ्यांचे तात्पुरत्या स्वरूपात निवारा शेडमध्ये स्थलांतर केले जाणार असून, यादरम्यान त्यांना नागरी सुविधा मोफत पुरविल्या जाणार आहेत.अडीचशे चौरस फुटांचे घर मिळणार?या प्रकल्पामध्ये लभार्थिंना २६९ चौ. फुटांची सदनिका दिली जाणार आहे. विक्रीच्या क्षेत्रफळाचा समावेश करण्यात आलेला नाही. याशिवाय त्या मोबदल्यात कोणताही टिडीआर दिला जाणार नाही. या प्रकल्पासाठी गुगल मॅपनुसार एकूण ६ हजार ६९३ झोपडपट्ट्या आढळल्या आहेत. तर विकसकाला एकूण ३६ गृहप्रकल्पांमधून ७ हजार १४३ सदनिका बांधण्याची परवानगी दिली आहे. पुनर्वसन सदनिकेचे क्षेत्रफळ २९६ चौ़ फूट असले, विक्रीसाठी ३०० ते ८०० चौ. फूट क्षेत्रफळ उपलब्ध असणार आहे. या प्रकल्पाची मूळ किंमत ९१० कोटी असून, सुधारित किंमत १ हजार ७५७ कोटी एवढी धरली आहे.दृष्टिक्षेपात४पुनर्वसन, पुनर्विकासाकरिता- ८०० कोटी४सुविधांकरिता- १६ कोटी४तात्पुरता निवारा- २३ कोटी४रहिवासी सदनिका- ७६० कोटी४विक्रीसाठी सदनिका- ८१ कोटी४मूलभूत सुविधा- ७७ कोटी४जागा मालकाकडूनजमीन विकत घेणे- २०० कोटी४एकूण प्रकल्प किंमत-१९५७ कोटीप्रकल्प बांधकाम खर्च४पुनवसनाकरिताचा खर्च-३३६० प्रति चौरस फूट चटईक्षेत्रावर४पुनर्विकासाचा खर्च-२१०० प्रति. चौरस फूट सुपर बील्टअप एरियावर४विक्रीसाठीचा खर्च - ३५६० प्रति चौरस फूट चटईक्षेत्रावर४विक्रीसाठीचा खर्च - २३०० प्रति. चौरस फूट सुपर बील्टअप क्षेत्रावर 

टॅग्स :Homeघरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड