डोक्यात गोळी झाडून अभियंत्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:25 IST2018-04-02T13:25:43+5:302018-04-02T13:25:43+5:30
मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान अभियंता पदावर काम करीत होता. गतवर्षी तो नोकरीनिमित्ताने पुण्यात आला होता.

डोक्यात गोळी झाडून अभियंत्याची आत्महत्या
पिंपरी : वाकड येथील ऱ्हिदम सोसायटीत राहणाऱ्या आयटी अभियंत्याने राहत्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आनंद बळवंत वासुदेव यादव (वय ३५) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऱ्हिदम सोसाटीत सदनिका क्रमांक ५०३ मध्ये यादव रहात असे, स्वतःच डोक्यात गोळी झाडून त्याने आत्महत्या केली. त्याच्या घरात चिट्ठी आढळून आली, त्यात त्याने नैराश्येमुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे, तो गुड फ्राय डे ला मुंबईला जाऊन आला, २०१५ ते २०१७ या कालावधीत तो हैदराबाद, मुंबई येथे माहिती तंत्रज्ञान अभियंता पदावर काम करीत होता, गतवर्षी तो नोकरीनिमित्ताने पुण्यात आला होता. वाकड पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहे घेत आहे.