कामशेत येथे अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 08:17 PM2018-08-07T20:17:15+5:302018-08-07T20:18:11+5:30

पुण्यावरून मुंबईकडे चाललेला कंटेनर (एमएच.४३ बीजी ९५३९ ) हरणाबाई मारुती शिंदे (वय ६८, रा. कामशेत) यांना धडक बसली.

The elderly woman seriously injured in a road accident in Kamtshet | कामशेत येथे अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी 

कामशेत येथे अपघातात वृद्ध महिला गंभीर जखमी 

googlenewsNext
ठळक मुद्देदोन्ही पायांवरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी

कामशेत : कामशेत गावच्या हद्दीतील जुना मुंबई पुणे महामार्गावरील पवना फाट्यावर मंगळवारी (दि. ७) सकाळी साडेदहा वाजल्याच्या सुमारास कंटेनरने एक वृद्ध महिलेला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली आहे.पुण्यावरून मुंबईकडे चाललेला कंटेनर (एमएच.४३ बीजी ९५३९ ) हरणाबाई मारुती शिंदे (वय ६८, रा. कामशेत) यांना धडक बसली व त्या कंटेनरच्या उजव्या टायरखाली आल्या. त्यांच्या दोन्ही पायांवरून कंटेनरचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहे. त्यांच्यावर सोमाटणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातातील कंटेनर चालक नरेंद्र प्रसाद दिवेदी याला कामशेत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

Web Title: The elderly woman seriously injured in a road accident in Kamtshet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.