शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
2
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
3
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
4
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
5
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
6
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
7
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
8
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
9
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
10
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
11
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
12
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
13
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
14
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
15
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
16
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
17
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
18
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
19
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी ! पिंपरी-चिंचवडमध्ये ED ची छापेमारी; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2023 16:46 IST

इडीच्या वतीने शुक्रवारी दिवसभर छापेमारी करण्यात आली...

पिंपरी : औद्योगिकनगरीतील दि सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष, संचालक अमर मुलचंदाणी यांच्यासह तीन संचालकांवर ठिकाणी सक्त वसुली संचलनालय अर्थात इडीच्या वतीने शुक्रवारी दिवसभर छापेमारी करण्यात आली. बेहिशोबी शेकडो कोटीचे कर्जवाटप केल्याप्रकरणी छापेमारी केली असावी, असा अंजाद आहे. याबाबत इडीकडून अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

पिंपरीतील दि सेवा विकास सहकारी बँकेत संगणमताने बेकायदेशीररित्या, आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आरबीआयने कारवाई केली आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी बँकेचा परवाना रद्द केला आहे. बँक गैरव्यवहार प्रकरणी इडीने कारवाई करावी, अशी मागणी ठेवीदारांनी केली होती.

शुक्रवारी सकाळीच इडीचे पथक पिंपरी-चिंचवड शहरात मध्ये दाखल झाले. पिंपरीतील गणेश हॉटेल, तपोवन मंदिराजवळ मिस्ट्री पॅलेस या इमारतीत अमर मुलचंदानी यांचे निवासस्थान आहे. याच ठिकाणी ईडीचे अधिकारी आज सकाळपासून ठाण मांडून आहेत. कसून तपासणी सुरू आहे. इमारतीखाली पोलीस व केंद्रीय तपास यंत्रणेचे जवान तैनात आहेत. कोणालाही या इमारतीत प्रवेश करू दिला जात नाही. तसेच मुलचंदानी यांचे जयहिंद महाविद्यालयासमोरील कार्यालय आहे. येथेही मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. सायंकाळी चारपर्यंत माजी संचालकांच्या निवासस्थान व कर्यालयात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. तसेच इतर संचालकांच्या घरीही पोलीसबंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

काय आहे प्रकरणदि सेवा विकास बँकेमध्ये २००९ पासूनच्या बेकायदेशीर कर्ज वाटप आणि अनियमित व्यवहारांबाबत माजी उपमहापौर डब्बू आसवानी, श्रीचंद आसवानी यांनी मुख्यमंत्री, सहकार आयुक्त तसेच संबंधित शासकीय संस्थांना निवेदन दिले. कारवाईची मागणी केली होती. तसेच त्यानंतर सहनिबंधक लेखापरीक्षण राजेश जाधवर यांनी २०१९ मध्ये बँकेचा चाचणी लेखा परीक्षण अहवाल सादर केला. या लेखापरीक्षण अहवालात अनेक कर्ज खात्यांबाबत आक्षेप घेतला होता. त्यामुळे या बँकेवर मागील वर्षी निर्बंध घातले होते. प्रशासकाची नेमणूक केली.

पोलिसांच्या तपासात १२४ कर्ज प्रकरणे नियमबाह्य आढळली होती. ज्यामध्ये बनावट कागदपत्रे घेऊन करोडो रुपयांची कर्जवाटप करण्यात आली होती. त्यानंतर मुलचंदानी यांच्यासह २५ जणांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांना जामीनही मिळाला. तसेच काही महिन्यांपूर्वी आरबीआयने बँकेचा परवाना रद्द केला आहे. यानंतर या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारच्या ई. डी. व आय. टी. विभागाने करावी. संचालक मंडळ यांची चल, अचल, स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करावी अशी मागणी  केली होती.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकDirectorate of Revenue Intelligenceमहसूल गुप्तचर संचालनालय