शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

पुढच्या वर्षी लवकर या...! उद्योग नगरीत गणरायाला निरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 18:29 IST

ढोल, ताशांचा दणदणाटात, पारंपरिक वाद्यांचा वापर,गुलाल विरहित मिरवणुका,पर्यावरण पूरक आरास असे पिंपरी-चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टये होते.

ठळक मुद्देइंद्रायणी,पवना व मुळा नदी काढच्या २६ ठिकाणी विसर्जन घाट सज्ज महानगर पालिकेच्या वतीने आरोग्य,वैद्यकीय विभाग तसेच अग्निशामक दल सज्जपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २२०० पोलीस कर्मचारी तैनात

विश्वास मोरे /पराग कुंकुलोळ पिंपरी-चिंचवड : ढोल, ताशांचा दणदणाटात, पारंपरिक वाद्यांचा वापर,गुलाल विरहित मिरवणुका,पर्यावरण पूरक आरास असे पिंपरी-चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टये होते.गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत उद्योग नगरीने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. दहा दिवसांपूर्वी गणरायाच्या आगमनाने उद्योगनगरी गणेशमय झाली होती.आज विसर्जनाचा दिवस असल्याने शहर परिसरातील इंद्रायणी,पवना व मुळा नदी काढच्या २६ ठिकाणी विसर्जन घाट सज्ज ठेवण्यात आले होते.पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या वतीने आरोग्य,वैद्यकीय विभाग तसेच अग्निशामक दल सज्ज ठेवण्यात आले होते.पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने २२०० पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. सीसीटीव्हीची नजर सोहळ्यावर होती.चिंचवड मधील विसर्जन मिरावणुकीची सुरवात दुपारी एक पासून झाली.तत्पूर्वी सकाळी सात वाजल्यापासूनच घरगुती गणरायाचे विसर्जन सुरू होते.पवना नदीवरील थेरगाव घाट,काकडेपार्क घाट,केजुदेवी घाट,रावेत घाट तसेच मोरया गोसावी समाधी मंदीर घाटावर विसर्जनासाठी गर्दी दिसून येत होती.चिंचवड स्टेशन,तानाजीनगर,भोईरनगर रस्त्याने विसर्जन मिरवणुका चापेकर चौकात येत होत्या.या ठिकाणी पोलीसांच्या वतीने स्वागतकक्ष उभारण्यात आला होता.येथे येणा?्या मंडळांचे श्रीफळ व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येत होते. स्वागत झाल्यानंतर वाल्हेकरवाडी जकतनाका मागार्ने मुरावणुका घाटाकडे मार्गस्थ होत होत्या.विसर्जन घाटावर विविध सामाजिक संस्थांच्या वतीने निर्माल्य व मूतीर्दान स्वीकारले जात होते.कृत्रिम हौदाची व्यवस्था महापालिकेच्या वतीने करण्यात आली होती. सायंकाळी चार नंतर विसर्जनासाठी गणेश मंडळांची संख्या वाढू लागली.वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूककोंडी होऊ नये या साठी वाहतुकीत बदल केला होता.विसर्जन मार्गावर वाहतूक शाखेचे कर्मचारी तैनात होते.रस्त्याच्या मध्ये बॅरिकेट्स टाकण्यात आले होते.ढोल, ताशांचा दणदणाटात, पारंपरिक वाद्यांचा वापर,गुलाल विरहित मिरवणुका,पर्यावरणपूरक आरास असे पिंपरी-चिंचवड मधील गणेश विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्टये होते.गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत उद्योग नगरीने गणरायाला भावपूर्ण निरोप दिला.----------महापालिकेला विसरसांस्कृतिक व संस्कृती रक्षणाचे गोडवे गाणा?्या महापालिकेतील सत्ताधारी भाजपला गणेश फेस्टिवल,गणेश सजावट स्पर्धा याच बरोबर गणेश भक्तांचा स्वागत कक्ष उभारण्याचा विसर पडला आहे.सण-उत्सव साजरे करण्यावर स्वायत्त संस्थाना उच्च न्यायालयाने बंधने घातल्याने यंदा चिंचवड गावातील चापेकर चौकात असणारा महापालिकेचा स्वागत कक्ष उभारण्यात आलेला नाही.पोलीस आयुक्तालयाने उभारलेल्या स्वागत कशातूनच गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत होते.---------क्षणचित्र१)गुलाल विरहित मिरवणूक ,पर्यावरण पूरक सजवटी वर भर२) अभूतपूर्व पोलीस बंदोबस्त,वाहतुकीचे नियोजन३) पारंपरिक वाद्यांचा वापर,सीसीटीव्हीची नजर४)गणरायाच्या निरोपाला सेल्फी ची क्रेझ ५)   नदी प्रदूशन टाळण्यासाठी मूतीर्दान व निर्माल्यदान देण्याचे आवाहन

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनPoliceपोलिस