गणेशोत्सव काळात भोसरीत चोरटे मुद्देमालासह जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 02:06 AM2017-09-08T02:06:05+5:302017-09-08T02:06:12+5:30

गणेशोत्सव काळात भोसरी पोलिसांनी चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद केले. ऐन गणेशोत्सवात त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने या कालावधितील भुरट्या चो-यांचे प्रमाण काही अंशी नियंत्रणात आले.

 During the Ganesh festival | गणेशोत्सव काळात भोसरीत चोरटे मुद्देमालासह जेरबंद

गणेशोत्सव काळात भोसरीत चोरटे मुद्देमालासह जेरबंद

Next

पिंपरी : गणेशोत्सव काळात भोसरी पोलिसांनी चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद केले. ऐन गणेशोत्सवात त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने या कालावधितील भुरट्या चो-यांचे प्रमाण काही अंशी नियंत्रणात आले.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी सोनसाखळी चोरांपैकी सुनील रामदास राठोड याला मोशी येथून पत्नीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत केली. दुसºया घटनेत गस्तीवरील पोलिसांनी भगतवस्ती येथून दीपक एकनाथ मुलगीर, किशोर उद्धव चिमटे या दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७० हजार रुपये किमतीची दुचाकी आणि सहा मोबाईल संच हस्तगत करण्यात आले. त्याचबरोबर चाँद गफूर शेख या तडीपार गुंडास फुलेनगर झोपडपट्टीतून ५ लाख २० हजार रुपये किमतीच्या सात दुचाकी आणि १८ मोबाईलसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ गुन्हे उघडकीस आले.
परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडुरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र विभांडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने ही कामगिरी केली.

Web Title:  During the Ganesh festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा