आकुर्डी : येथील म्हाळसाकांत शाळेजवळ आज सकाळी (गुरूवार दि. ०२) नऊच्या सुमारास एका डंपरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला.आशिष दीपक पाऊसकर (वय २२, शुभश्री सोसायटी, आकुर्डी) असे मृताचे नाव असून तो सिम्बायोसिस महाविद्यालयात इंजिनिअरिंगला शिकत होता. तर त्याचे वडील मुंबईला राहतात. आई शिक्षिका असून आई व मुलगा दोघेही आकुर्डीत राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आशीश त्याच्या मित्रासोबत (एम एच १४ एआय ८७४८) या दुचाकीवरून खंडोबा चौकातून म्हाळसकांत चौकात जात होता. यावेळी त्याला नवीन चासी असणार्या ट्रकने धडक दिली यात आशिषच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तो जागीच मरण पावला तर त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे.
डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत आकुर्डीतील महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:48 IST