जेवण बनवले नाही म्हणून दारुच्या नशेत पत्नीचा डोक्यात दगड घालून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 16:58 IST2018-02-22T16:53:50+5:302018-02-22T16:58:38+5:30
जेवण बनवले नाही या कारणावरून चिडून जाऊन नवऱ्याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अशोक विठ्ठल चौरे (वय ४०) याला अटक केली आहे.
_201707279.jpg)
जेवण बनवले नाही म्हणून दारुच्या नशेत पत्नीचा डोक्यात दगड घालून खून
तळेगाव दाभाडे : जेवण बनवले नाही या कारणावरून चिडून जाऊन नवऱ्याने दारूच्या नशेत पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अशोक विठ्ठल चौरे (वय ४०) याला अटक केली आहे. शारदा अशोक चौरे (वय ३४, रा. भगवान संतू दरेकर विटभट्टी, नवलाख उंबरे, ता. मावळ, जि. पुणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
ही घटना नवलाख उंबरे गावच्या शिवारात भगवान संतू दरेकर यांच्या विटभट्टीवर बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. तर हा प्रकार गुरूवारी सकाळी उघडकीस आला. या संदर्भात देवेश शंकर वाघमारे (वय १७, रा. भगवान संतू दरेकर विटभट्टी, नवलाख उंबरे, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मृत शारदा चौरे यांचे पती अशोक चौरे याला पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी देहूरोड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणपतराव माडगूळकर, सहायक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांनी भेट दिली.
आरोपीस शुक्रवारी वडगाव न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम पासलकर करीत आहे.