शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

वाहतूक काेंडीच्या धास्तीने तळवडेतील अायटी पार्क वापराविना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 5:53 PM

हिंजवडीत हाेणाऱ्या वाहतूक काेंडीमुळे येथील कंपन्या काढतापाय घेण्याच्या विचारात असताना अाता तळवडे येथील कंपन्यांनाही वाहतूक काेंडीचा फटका बसत अाहे.

तळवडे : हिंजवडीतील वाहतूककोंडीमुळे येथील कंपन्या स्थलांतराचा विचार करत असताना अाता तळवडे येथील कंपन्यांनाही अशाच पद्धतीने वाहतूककोंडीच्या समस्यांचा सामना करावा लागत अाहे. त्यामुळे तळवडे आयटी पार्कमध्ये नवीन कंपन्या येण्यास धजावत नाहीत. परिणामी येथील एमआयडीसीची इमारत पडून आहे. औद्योगिक आणि आयटी पार्कसाठी उभारण्यात आलेल्या खासगी इमारतीही अशाच वापराविना आहेत. 

 पिंपरी-चिंचवड परिसरात तळवडे येथे आयटी पार्क आहे. या ठिकाणी अनेक बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. सध्या वीस हजार सॉफ्टवेअर अभियंते काम करीत आहेत. पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातून या ठिकाणी कामासाठी येणारे कर्मचारी निगडीमार्गे  येत असतात. निगडी ते तळवडे मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झालेली असते. आॅटो रिक्षा, बस यांनी संपूर्ण रस्ता व्यापलेला असतो. बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही याचा फटका बसतो. पादचाऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागतो.

   सॉफ्टवेअर चौकात येथील सॉफ्टवेअर कंपन्यांच्या वतीने वाहतूक नियमन करण्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत, परंतु त्यांनाही वाहनचालक सहकार्य करीत नाहीत. यामुळे वाहतुकीचा गोंधळ होत असतो. यामुळे येथील संगणक अभियंत्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त करीत आहेत. वाहतूककोंडीत अडकलेले अभियंते कित्येकदा एक एक किलोमीटर पायी प्रवास करत कामावर जातात. एमआयडीसीच्या वतीनेही त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. तळवडे वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस उग्र स्वरूप धारण करीत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी, सॉफ्टवेअर कंपन्यांचे प्रतिनिधी, ग्रामस्थ वेळोवेळी पोलीस कर्मचारी नेमणूक करण्याची मागणी करीत आहेत. 

    याविषयी बाेलताना सिंटेल साॅफ्टेवेअरचे प्रशासकीय व्यवस्थापक जयंत काेंडे म्हणाले, तळवडे येथील सॉफ्टवेअर परिसरात असलेल्या कंपन्यांमधील कर्मचारी वाहतूक कोंडीबाबत वारंवार तक्रार करीत असतात. मात्र त्यामध्ये शासनाच्या वतीने योग्य ती कारवाई करुन सुधारणा होईल अशी अपेक्षा असल्याने या कंपन्या येथून बाहेर पडण्याचा विचार करत नाहीत. परंतु वाहतूक कोंडीची समस्या असल्यामुळे या परिसरात कोणतीही नवीन कंपनी स्थापन करण्याचे धाडस करत नाही. या ठिकाणी बालन व पेश ग्रुपचे टॉवर, तसेच एमआयडीसीची आयटी टॉवर इमारत सुसज्ज असूनही वापराविना पडून आहेत. त्यामुळे येथील समस्या सोडविल्यास आणखी कंपन्या येऊन विकास होऊ शकतो.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडtalawadeतळवडेITमाहिती तंत्रज्ञानTrafficवाहतूक कोंडी