शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, एजंट घेतात वाहन चालवण्याची चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 18:03 IST

आरटीओ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत चालतोय ‘कारभार’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) महालक्ष्मी ट्रॅफिक पार्कमध्ये आरटीओच्या अनुपस्थितीत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे चालक, एजंट उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेत असल्याचे उघड झाले आहे. यावरून आरटीओच्या कारभारावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बहुतांश अपघात मानवी चुकांमुळे होतात. काही अपघातात चालक नवीन असल्याचे उघड झाले आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी ‘रस्ते सुरक्षा अभियाना’ सारख्या विविध उपाययोजना आरटीओकडून केल्या जात आहेत. पण, ज्या आरटीओला वाहन चालवण्याचा परवाना देण्याचा अधिकार आहे, ते अधिकारी परवाना देताना हलगर्जीपणा करताना दिसून येत आहे.

‘लोकमत’ला काय दिसले..?

१. पिंपरीतील आरटीओकडे दररोज सरासरी २५० हून अधिक चारचाकी तर ३०० हून अधिक दुचाकीस्वारांची चाचणी होते. सोमवारी पिंपरी-चिंचवड आरटीओच्या महालक्ष्मी ट्रॅफिक पार्कमध्ये मोटर वाहन निरीक्षक मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या चालकांनाच ‘टेस्ट’ घेण्यास सांगून निघून गेले !२. काही वेळ मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे चालक उमेदवारांची चढावर गाडी घेऊन जाणे आणि रिव्हर्स घेऊन येणे, ही चाचणी घेऊन त्यांना पास असल्याचे सांगत होते. काही वेळानंतर संबंधित अधिकारी आल्यावर चाचणी झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे त्यांना सही करण्यासाठी देण्यात आली. एजंट आणि ड्रायव्हिंग स्कूलकडून आलेल्या कागपत्रांवर पास असल्याचे शेरे आणि सह्या प्राधान्याने देण्यात आल्या.

हे आहेत प्रश्न

१. आरटीओ कार्यालय शासकीय अधिकारी, कर्मचारी चालवतात की एजंट?२. सर्वसामान्य नागरिकांना वेगळा न्याय आणि ड्रायव्हिंग स्कूल चालकांना वेगळा न्याय का?३. अधिकाऱ्यांकडून ड्रायव्हिंग स्कूल चालकांना इतकी सवलत का?४. ड्रायव्हिंग स्कूल चालकांना टेस्ट घेण्याचा अधिकार आहे का? तो कोणी दिला?

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसbikeबाईकcarकारSocialसामाजिक