drivers neglected of school bus checking | पिंपरीत स्कूल बस तपासणीबाबत चालकांची अनास्था
पिंपरीत स्कूल बस तपासणीबाबत चालकांची अनास्था

ठळक मुद्दे२१३३ पैकी ९०० बसची तपासणी : आरटीओच्या आवाहनाकडे होतेय दुर्लक्ष५२७ खासगी शाळा, १०५ महापालिका शाळा , शिक्षण संस्था चालकांचे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बसची तपासणी करणे अनिवार्य

पिंपरी : स्कूल बसची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले होते.त्यानुसार, शहरात २१३३ स्कूलबस व व्हॅन असून त्यापैकी फक्त ९०० वाहनचालकांनी तपासणी पूर्ण केली आहे.
‘सुरक्षित विद्यार्थी वाहतूक’ करण्यासाठी वाहनांची तपासणी करावी. वाहन शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार असणे आवश्यक आहे. आपल्या वाहनाचा विमा कर, परवाना आदी वैध कागदपत्रे जवळ बाळगावीत. त्याचप्रमाणे अग्निशामन यंत्र, मुलींची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला मदतनीसाची नेमणूक करणे अनिवार्य आहे. आपले वाहन या अटींची पूर्तता करत नसल्यास उपप्रादेशिक कार्यालयात आपल्या वाहनांची तपासणी करून घेण्याचे आवाहन केले होते. 
उच्य न्यायालयाच्या आदेशानुसार दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओ कार्यालयाकडून स्कूल बसची तपासणी करणे अनिवार्य आहे. मात्र, शहरातील अनेक चालक-मालक वाहनांची तपासणी करत नसल्याचे निदर्शनास आले आहे.  स्कूल बसचालकांनी आवाहनास केराची टोपली दाखवली आहे. 
शहरात ५२७ खासगी शाळा व १०५ महापालिकेच्या शाळा आहेत.  स्कूल बसचालक नियमांचे उल्लंघन करत प्रमाणापेक्षा जास्त मुलांची वाहतूक करताना दिसून येतात.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसची तपासणी करणे आवश्यक आहे. याबाबत चालकांना आवाहन केले आहे. कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या  चालकांनी लवकर वाहनांची तपासणी करून घ्यावी.
- आनंद पाटील, अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड होते. त्यानुसार, शहरात २१३३ स्कूलबस व व्हॅन असून त्यापैकी फक्त ९०० वाहनचालकांनी तपासणी पूर्ण केली आह.
.............
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बसची तपासणी करणे आवश्यक आहे. आमच्या संघटनेच्या बहुतांश चालकांनी तपासणी पूर्ण केली आहे. ज्यांच्या वाहनांची तपासणी झाली नसेल त्यांच्या वाहनांचा पासिंग काळ अजून संपला नसेल.- उदय दळवी, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ


 


Web Title: drivers neglected of school bus checking
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.