शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरात राहूनच साजरी करावी : पिंपरी-चिंचवडच्या महापौरांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 20:59 IST

शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सर्व आदेश आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करा..

ठळक मुद्दे शहरातील विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने महापौर उषा ढोरे यांची घेतली भेट

पिंपरी : कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात शासनाच्यावतीने देण्यात आलेल्या सर्व आदेश आणि सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी कोणीही घराबाहेर न पडता, घरात राहूनच अभिवादन करावे, असे आवाहन महापौर ऊषा ढोरे यांनी केले.कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्यावतीने लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन या काळात करता येणार नाही. या पार्श्वभूमीवर पिंंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दि. ११ ते १४ एप्रिल या दरम्यानसाजरा होणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन सर्व कार्यक्रम कोरोना विषाणू संसर्गाचा धोका पूर्णत:टळल्यानंतर यावर्षी योग्य वेळ निश्चित करून आगामी कालावधीत घेण्यात येणार आहे.महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रबोधन पर्वाच्या आयोजनासंदर्भात आज शहरातील विविध पक्षांच्या शिष्टमंडळाने महापौर उषा ढोरे यांची भेट घेतली. त्यानंतर महापौर ढोरे, पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या शिष्टमंडळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या राज्य सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब रोकडे, दशरथ ठाणांबीर, एमआयएमचे प्रवक्ते धम्मराज साळवे, भीमशाही संघटनेचे शिवशंकर उबाळे, नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीश वाघमारे, समता सैनिक दलाचे मनोज गरबडे, स्वराज प्रतिष्ठानचे बापूसाहेब वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते प्रदोष जाधव आदी उपस्थित होते. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMayorमहापौरdr. babasaheb ambedkar birthday celebrationडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस