"खचून न जाता महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा", नाना काटेंनी घेतली शरद पवारांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2023 11:13 AM2023-03-07T11:13:33+5:302023-03-07T11:13:41+5:30

'मविआ' साठी सध्या अत्यंत सकारात्मक स्थिती असून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत योग्य पद्धतीने नियोजन केल्यास विजय आपलाच असणार

Don't get tired and start preparing for municipal election Nana Kate visited Sharad Pawar | "खचून न जाता महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा", नाना काटेंनी घेतली शरद पवारांची भेट

"खचून न जाता महापालिका निवडणुकींच्या तयारीला लागा", नाना काटेंनी घेतली शरद पवारांची भेट

googlenewsNext

पिंपळे सौदागर : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मतदारांनी आपल्याला चांगला कौल दिला आहे. आपल्यासाठी संधी असतानाही त्याचे विजयात रूपांतर झाले नसले, तरी खचून न जाता, या निवडणुकीत झालेल्या चुकांमध्ये सुधारणा करून, पुढील निवडणुकीच्या तयारी लागा, अशा सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाना काटे यांच्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना दिल्या.

चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, राष्ट्रवादीचे प्रदेश समन्वयक सुहास उभे, राष्ट्रवादी विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, माजी आमदार उल्हास पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत, निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.

यावेळी शरद पवार यांनी चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रभागनिहाय माहिती घेतली. कोणत्या प्रभागात किती मते पडली, कोणी-कोणी काम केले, आपल्यासाठी परिस्थिती सकारात्मक असतानाही आपण कोठे कमी पडलो, यासह निवडणुकीतील प्रत्येक बारकाव्यांबाबत माहिती घेतली. यावेळी नाना काटे यांच्यासह उपस्थित प्रमुख मान्यवरांनी संपूर्ण माहिती दिली. भाजपच्या नेत्यांनी शेवटच्या टप्प्यात प्रशासकीय यंत्रणेचा केलेला गैरवापर, कार्यकर्त्यांना पोलिसांनी दिलेला त्रास यासह सर्व माहिती दिली.

पवार म्हणाले, महाविकास आघाडीसाठी सध्या अत्यंत सकारात्मक स्थिती आहे. येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत आपण योग्य पद्धतीने नियोजन करून काम केल्यास विजय आपलाच असणार आहे. मतदारानांही आता बदल हवा असल्याने आपल्याला अत्यंत जबाबदारीने काम करावे लागणार आहे. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या चुकांमध्ये दुरुस्ती करून येणाऱ्या महापालिका निवडणुकींच्या तयारीला आतापासून लागा. येत्या काही दिवसांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेऊ यात, असेही शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती नाना काटे यांनी दिली.

Web Title: Don't get tired and start preparing for municipal election Nana Kate visited Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.