"गर्भपात कर नाही तर व्हिडिओ व्हायरल करतो..." तरुणाविरोधात गुन्हा दाखल

By रोशन मोरे | Updated: September 23, 2023 18:30 IST2023-09-23T18:29:43+5:302023-09-23T18:30:05+5:30

त्यानुसार पोलिसांनी संशयित आकाश शंकर जगदाळे (३२, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे....

"Don't do abortion but make the video go viral..." A case has been filed against the young man | "गर्भपात कर नाही तर व्हिडिओ व्हायरल करतो..." तरुणाविरोधात गुन्हा दाखल

"गर्भपात कर नाही तर व्हिडिओ व्हायरल करतो..." तरुणाविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून २९ वर्षीय तरुणीवर अत्याचार करत तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. ही घटना जानेवारी २०२२ ते १७ जुलै २०२३ या कालावधीत ताथवडे, पुणे, तळेगाव दाभाडे येथे घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी संशयित आकाश शंकर जगदाळे (३२, रा. तळेगाव दाभाडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि संशयिताची ओळख मेट्रोमोनियल साईटद्वारे झाले. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून पीडित तरुणीवर अत्याचार केला. ती गर्भवती राहिला असता तिला गर्भपात केला नाही तर लग्न करणार नाही, अशी धमकी देत गर्भपात करण्यास भाग पाडले. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता तिच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी संशयिताने दिली.

Web Title: "Don't do abortion but make the video go viral..." A case has been filed against the young man