Pimpri chinchwad: पूर्ववैमनस्यातून दोघांमध्ये वाद; मारहाण करून दशहत, रहाटणीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 01:39 PM2024-03-08T13:39:38+5:302024-03-08T13:40:01+5:30

पिंपरी : मागील वर्षी झालेल्या वादातून दोघांमध्ये बेदम हाणामारी झाली. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद केली. काळेवाडी लिंक रोड, ...

dispute between two due to animosity; Dashat by beating, incident in Rahatni | Pimpri chinchwad: पूर्ववैमनस्यातून दोघांमध्ये वाद; मारहाण करून दशहत, रहाटणीतील घटना

Pimpri chinchwad: पूर्ववैमनस्यातून दोघांमध्ये वाद; मारहाण करून दशहत, रहाटणीतील घटना

पिंपरी : मागील वर्षी झालेल्या वादातून दोघांमध्ये बेदम हाणामारी झाली. याप्रकरणी एकमेकांच्या विरोधात गुन्ह्यांची नोंद केली. काळेवाडी लिंक रोड, रहाटणी येथे मंगळवारी (दि. ५) सायंकाळी ही घटना घडली.

पंकज संतोष चोथे (२४, रा. थेरगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पप्या गिरी (३०, रा. मोरेवस्ती, चिखली) आणि त्याचे दोन साथीदार यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी पंकज आणि त्यांचा मित्र श्रवण माचरे यांनी शिफ्टने रिक्षा चालवण्यासाठी घेतली आहे. रिक्षा दुरुस्त करण्यासाठी ते काळेवाडी लिंक रोडवर असलेल्या एका गॅरेजवर गेले. तिथे पप्या त्याच्या दोन मित्रांसह दारू पीत होता. पप्याने पंकज यांना हाक मारून बोलावून घेतले. मागील वर्षी झालेल्या भांडणाच्या रागातून वाद घालून पुन्हा मारहाण केली. पप्या आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादी पंकज यास मारहाण केली. तसेच, फोन करून आणखी साथीदारांना बोलावून घेतल्याचे पंकज यांनी ऐकले.

त्यानंतर पप्या आणि त्याच्या साथीदारांनी फिर्यादी पंकज यास जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच, पंकज यांच्या खिशातील मोबाइल फोन व दोन हजार १०० रुपये काढून घेतले. तेथे आरडाओरडा करून पप्या आणि त्याचे साथीदार दहशत निर्माण करू लागल्याने आजूबाजूचे लोक तेथून निघून गेले.परस्पर विरोधात गिरीश दीपक मनवे ऊर्फ पप्पू गिरी (२८, रा. साने चौक, चिखली) यांनी फिर्याद दिली. पंकज संतोष चोथे याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी हे काळेवाडी लिंक रोडवर असलेल्या एका गॅरेजजवळ थांबले असता पंकज तिथे आला. मागच्या वर्षी मला मारले होते. तुला आठवते का, असे म्हणत त्याने फिर्यादी पप्पू यास शिवीगाळ करून मारहाण केली. तिथे पडलेला दगड फेकून मारला. तो दगड पप्पू यांनी हुकवला. दगड लागल्यास पप्पू यांचा मृत्यू होऊ शकतो, हे माहिती असताना त्याने दगड मारला. त्यानंतर मोठमोठ्याने आरडाओरडा केला.

Web Title: dispute between two due to animosity; Dashat by beating, incident in Rahatni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.