शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

Video: पाण्यापासून वंचित! डोक्यावर बोचकं घेत महिला मुला, बाळांसह दलित कुटुंब निघाले मंत्रालयात, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 14:00 IST

पाण्यापासून वंचित ठेवलं जातं, घरात येऊन मारझोड केली जाते, स्थानिक स्तरावर न्याय मिळत नाही त्यामुळे न्यायासाठी दलित महिला पिंपरी चिंचवडहुन मंत्रालयात पायपीट करत निघाल्या

अश्विनी केदारी - जाधव 

पुणे: डोक्यावर असं बाचकं घेऊन ही महिला आपल्या कुटुंबासोबत पुण्यातील पिंपरी चिंचवड होऊन मुंबईकडे पायी चालत निघाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी तिचा संघर्ष सुरू आहे. मूळचे थेरगावचे असणारे हे कुटुंब सध्या जुन्या पुणे मुंबई हायवे वरून पायी चालत मुंबईच्या दिशेने निघालेत आता ते पनवेलला पोहोचले. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी हे कुटुंबीय पायपीट करत मुंबईला निघालेत. स्थानिक स्तरावर आपल्याला न्याय मिळत नाहीये त्यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांकडून न्यायाची अपेक्षा आहे, असं सांगत ही महिला मंत्रालयात निघाली. 

जातीवाचक शिव्या दिल्या जातात मारझोड केली जाते, घरात घुसून धमकावले जातं इतकच काय तर पिण्याचे पाणी तोडलं, शौचालय तोडलं, अनेक प्रकारचा अन्याय मागच्या काही दिवसांपासून आमच्यावर होतोय असा आरोप या महिलेने केलाय. आणि त्यासाठीच तीन बहिणी आणि एक लहान मुलगा आणि मुलगी हातात बॅनर घेऊन मुंबईच्या दिशेने पायपीट करतात. मुंबईला पायी जाताना त्यांच्या हाती असलेल्या बॅनरवर, बाबासाहेबांनी दलितांसाठी चवदार तळे खुले केले. पण प्रशासनाने दलित कुटुंबाला 6 महिने पाण्यापासून वंचित ठेवले असा आरोपही केला आहे.

 पोलीस स्टेशनमध्ये गेलो तरी आमचे तक्रार घेतली जात नाही पोलिसांकडून मारझोड होते असा आरोप या महिलांनी केला असला तरी प्रशासन आणि पोलिसांनी त्यांचे आरोप फेटाळल्याचे  समोर येत आहे.महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन आपल्याला न्याय देत नसल्याने हे लोंढे कुटुंब आता मुंबईत मंत्रालयात थेट मुख्यमंत्र्यांचे भेट घेणारे आणि तिथेही न्याय मिळाला तर ते दिल्ली गाठणार असल्याचं  त्यांचं म्हणणं आहे. 

टॅग्स :PuneपुणेFamilyपरिवारpanvelपनवेलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसHomeसुंदर गृहनियोजन