श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 05:28 PM2024-04-24T17:28:46+5:302024-04-24T17:29:29+5:30

यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे

Departure of Sri Sant Tukaram Maharaj palanquin on June 28 Rest and stay will be changed in 2 places | श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार

श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २८ जुनला प्रस्थान; विसावा अन् मुक्काम २ ठिकाणी बदल करणार

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शुक्रवार दि. २८ जुन २०२४ रोजी दुपारी २ वाजता होणार आहे. या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याच्या तयारीला श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने सुरवात करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (दि. २४) सोहळ्यासाठी संस्थानच्या वतीने या सोहळ्याचे सोहळा प्रमुखांची निवड प्रसिध्दीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

यंदाचा पालखी सोहळा कडक उन्हाळा व निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर होत असला तरी भाविकांना व वारकऱ्यांना याचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे यंदा पालखी सोहळा नेहमी प्रमाणेच उत्साहात होण्याची शक्यता असून यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाचे हे या विश्वस्त मंडळाचे शेवटचे वर्ष असल्याने यंदाचा पालखी सोहळा प्रमुख म्हणून विशाल केशव मोरे, माणिक महाराज मोरे व संतोष महाराज मोरे यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे.

लोणी काळभोर ते यवत हे सुमारे वीस ते पंचवीस किलोमीटर आहे. त्याच प्रमाणे लोणी काळभोर येथे सर्व दिंड्या बारस सोडून निघत असतात. पालखी उरुळी कांचन येथे दुपारच्या विश्रांतीच्या वेळी दिड तास गावात पालखी जाण्यात व येण्यासाठी दिड तास लागतो. त्यामुळे येथून पालखी निघण्यास उशीर लागत असल्याने यवत येथील मुक्कामी पोहचण्यासाठी उशीर लागतो. यामुळे उरुळी कांचन येथील ग्रामस्थांना विनंती करून दुपारचा विसावा पालखी मार्गावर म्हणजे महामार्गावर ठेवावा अशी विनंती करणार आहे. त्याच प्रमाणे लोणी काळभोर येथील मुक्कामही नवीन पालखी तळावर करणार असल्याची माहिती  श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली.

Web Title: Departure of Sri Sant Tukaram Maharaj palanquin on June 28 Rest and stay will be changed in 2 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.