शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

एसएसपीएमएस शाळेच्या मैदानावर दीपोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 1:23 AM

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘श्री छत्रपती शिवाजीमहाराज दीपोत्सव २०१८’, पर्व ७ चे. श्री शिवछत्रपती

पुणे : तुतारीची ललकारी... सनईचौघड्यांचा मंगलमय सूर आणि श्री शिवछत्रपतींचा प्रचंड जयघोष... अशा शिवमय झालेल्या वातावरणात तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या अष्टसहस्र पणत्यांच्या लखलखाटात श्री छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पहिल्या भव्यदिव्य अश्वारूढ पुतळ्याला मानवंदना दिली.

निमित्त होते, शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित ‘श्री छत्रपती शिवाजीमहाराज दीपोत्सव २०१८’, पर्व ७ चे. श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन पुणे शहर पोलीस सहआयुक्त शिवाजीराव बोडखे, ज्येष्ठ विधिज्ञ प्रताप परदेशी, समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सुनील मारणे व शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते झाले.

अटकेपार झेंडा फडकवणारे पानिपत वीर सरदार मानाजी पायगुडे, श्रीमंत सरदार कान्होजी कोंडे, सरदार बाबाजी ढमढेरे, शिवसरदार पिलाजीराव सणस, सरदार हैबतराव शिळीमकर, सरदार त्र्यंबकराव नाईक निवंगुणे, सरदार जैताजी नाईक करंजावणे, सरदार कडू, प्रतापगड युद्धवीर सरदार बाबाजी आढळराव डोहर धुमाळ या स्वराज्य घराण्यांच्या प्रतिनिधींना शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव केला.

बोडखे म्हणाले, पुण्यात साजऱ्या होणाऱ्या दीपोत्सवाचा शिरोमणी म्हणून हा दीपोत्सव पुणेकरांच्या हृदयात विराजमान झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यासारखा दिमाखदार उत्सव साजरा केला जातो.गायकवाड म्हणाले, या ऐतिहासिक पुतळ्याने ९१व्या वर्षांत पदार्पण केले आहे. पुतळ्याचे वजन तब्बल ८ हजार किलो आहे.नियोजन ललित शिंदे, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, दीपक घुले, अनिल पवार, दिग्विजय जेधे, महेश मालुसरे व स्वराज्य बांधवांनी केले.

टॅग्स :PuneपुणेDiwaliदिवाळी