शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट न घातल्याने तरुणाचा अपघातात मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2019 15:38 IST

वळण घेताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून तरुण रस्त्यावर पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.

पिंपरी : वळण घेताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून तरुण रस्त्यावर पडला. त्यात गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हिंजवडी येथील पॉवर हाऊस जवळ झाला. दुचाकी चालवताना तरुणाने हेल्मेट परिधान केले नव्हते. त्यामुळे त्याच्या डाेक्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा मृत्यू झाला.  

अमन पांडे (वय 20, मूळ रा. मध्यप्रदेश) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमन हिंजवडी जवळील इंदिरा महाविद्यालयात बीबीए च्या दुस-या वर्षात शिकत होता. तो आज सकाळी त्याच्या नातेवाईक महिलेला आपल्या  दुचाकीवरून (एम एच 12 / सी एम 2633) हिंजवडी येथील टीसीएस कंपनीत सोडण्यासाठी आला होता. महिलेला कंपनीत सोडून तो परत महाविद्यालयाकडे जात होता. हिंजवडी मधील पावर हाऊस जवळच्या वळणावर त्याचे त्याच्या दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी स्लिप होऊन तो खाली पडला. गाडीचा वेग जास्त असल्याने तो घसरत गेला. तसेच त्याच्या डोक्याला हेल्मेट घातले नसल्याने गंभीर इजा झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान तो रस्त्यावर पडल्याने एका कारला धडकला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघातpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDeathमृत्यू