शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नशेच्या धुंदीत घरात घुसणे पडले महागात,चोरट्याला गमवावा लागला जीव; भोसरीतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 15:50 IST

आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी चोरट्याला पकडत बांधून ठेवले..

ठळक मुद्देशवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण होईल स्पष्ट

पिंपरी : नशेत असलेला चोरटा घरात घुसला. त्यामुळे आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी त्याला पकडून बांधून ठेवले. त्यानंतर नागरिकांनी पोलीस ठाणे गाठले. दरम्यान चोरट्याचा मृत्यू झाला. भोसरी येथे मंगळवारी (दि. १८) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.संतोष महादेव हावसे (वय २७, रा. दिघी) असे मृत्यू झालेल्या चोरट्याचे नाव आहे.

भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हावसे हा मोलमजुरी करीत होता. तसेच तो व्यसनाधीन होता. सतत नशेत असायचा. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास भोसरी येथील एका घरात तो घुसला. त्यावेळी घरातील व्यक्तींनी आरडाओरडा केला. त्यामुळे नागरिकांनी संतोष याला पकडून बांधून ठेवले. घडलेल्या प्रकाराबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याबाबत तक्रार देण्यासाठी त्यांनी भोसरी पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बांधून ठेवलेला संतोष हावसे हा बेशुद्धावस्थेत असल्याचे दिसून आल्यामुळे पोलिसांनी त्याला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. संतोष हावसे याच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

टॅग्स :bhosariभोसरीCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसDeathमृत्यू